पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरात आलेले गुलाब चक्रीवादळ आता पश्चिमेकडे सरकू लागले आहे. त्यामुळे या वादळाचा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना तडाखा बसला असून, अनेक नद्यांना पूर आले. 29 सप्टेंबर रोजीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गुलाब चक्रिवादळाचा राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे काही तास राज्यावर असणार आहे. येत्या 24 तासांत,मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस व अतीवृष्टीची शक्यता असून, मुंबई,ठाण्यासह उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भआत मात्र बुधवारी पावसाचा जोर कमी असेल असे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः खड्ड्यांबाबत आयुक्तांची तारीख पे तारीख)
या राज्यांत मुसळधार
पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार व धुळे या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर काही भागांना गडगडाटासह वीजांचा देखील धोका असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Nowcast warning at 0700, 29/9: Intense to very intense spells of rain very likely to occur at isol places in districts of Palghar, Thane, Mumbai, Nasik, Ahmednagar, Nandurbar, Dhule nxt 3-4 hours. Possibility of thunder/lightning with gusty winds in some areas. TC
-IMD MUMBAI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 29, 2021
29 सप्टेंबर रोजी या 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट-
रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार.
30 सप्टेंबर रोजी मात्र राज्यातील कुठल्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. त्यामुळे 30 सप्टेंबर नंतर राज्याला वादळाचा कुठलाही धोका नसल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचाः एक हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची भीती)