Interest Rates in India : व्याजदर कमी करण्यावर रिझर्व्ह बँक गव्हर्नर नेमकं काय म्हणाले?

Interest Rates in India : व्याजदर कमी करण्याची ही योग्य वेळ नव्हे, असं गव्हर्नर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

126
Interest Rates in India : व्याजदर कमी करण्यावर रिझर्व्ह बँक गव्हर्नर नेमकं काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्याजदर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही असं स्पष्ट केलं आहे. देशाची पूर्ण नियंत्रणात नसलेली अर्थव्यवस्था आणि ५ टक्क्यांच्या जवळ असलेला महागाई दर ही त्या मागची मुख्य कारणं असल्याचंही दास यांनी म्हटलं आहे. (Interest Rates in India)

‘फक्त भारतच नाही तर जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था डळमळीत आहे. अनिश्चिततेचं वातावरण आहे. देशातील महागाई दर सातत्याने ५ टक्क्यांच्या जवळपास आहे. अशावेळी व्याजदर कपातीची चर्चाही आपण करू शकत नाही,’ असं शक्तिकांत दास सीएनबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले. (Interest Rates in India)

इतकंच नाही तर, ‘व्याजदर कपातीवर बोलून मी लोकांची विचारांची दिशा भरकटवू इच्छित नाही,’ असं म्हणत त्यांनी देशाची पुढली पतधोरणाची दिशाही जवळ जवळ स्पष्ट केली. ७ जूनला शेवटचं तिमाही पतधोरण जाहीर झालं तेव्हा मध्यवर्ती बँकेतील पाचही तज्ज्ञांनी व्याजदर कपातीच्या विरोधात मतदान केलं होतं. (Interest Rates in India)

(हेही वाचा – Sanjay Raut: विधान भवनात संजय राऊत आणि मंत्री Chandrakant Patil यांची गळाभेट म्हणाले; अरे व्वा, आपण परत…)

…तोपर्यंत मध्यवर्ती बँक दरकपातीचा निर्णय घेणार नाही – दास

महागाई दर ४ टक्क्यांवर आणणं हे रिझर्व्ह बँकेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि सध्या हा दर ५ रुपयांवरच स्थिरावला आहे. जोपर्यंत तो ४ टक्क्यांवर येत नाही, तोपर्यंत मध्यवर्ती बँक दरकपातीचा निर्णय घेणार नाही, असं दास यांचं म्हणणं आहे. रिझर्व्ह बँक ज्या व्याजदराने इतर व्यावसायिक बँकांना कर्ज देते त्या दराला रपोदर असं म्हणतात. हा दर वाढला तर बँकांना व्याजापोटी रिझर्व्ह बँकेला जास्त पैसे द्यावे लागतात. (Interest Rates in India)

त्यामुळे त्यांची इतरांना कर्ज देण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे लोकांना पुरेशी कर्ज मिळत नाहीत. मिळतात ती चढ्या दराने मिळाल्यामुळे लोकांचं कर्ज घेण्याचं प्रमाण कमी होतं. परिणामी, लोकांच्या हातात कमी पैसा खेळता राहतो आणि बाजारपेठेत वस्तू आणि सेवांची मागणी कमी होऊन वस्तू व सेवांचे दरही कमी होतात. याचा परिणाम महागाई कमी होण्यात होतो. व्याजदर हे रिझर्व्ह बँकेच्या हातातील महागाई आटोक्यात आणण्याचं मुख्य अस्त्र मानलं जातं. २०२४ साली व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. (Interest Rates in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.