Ayodhya Shri Ram Mandir : श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा

251

श्रीराम मंदिराच्या (Ayodhya Shri Ram Mandir) लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये रामायणातील प्रसंगांच्या सर्जनशील आणि स्वयंभू निवडक कल्पनाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आर्ट इंडिया फाउंडेशनच्या संचालिका डॉ. प्राची साठे यांनी दिली.

अयोध्येतील राममंदिर (Ayodhya Shri Ram Mandir) निर्मिती निमित्ताने आर्ट इंडिया फाउंडेशनचे संस्थापक स्वर्गीय मिलिंद साठे यांच्या संकल्पनेतून खुला आसमान या उपक्रमाअंतर्गत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पंधरा देशातील 1820 शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेतला. त्यातून 287 चित्रे पारितोषिक पात्र ठरली. भौगोलिक क्षेत्र, वयोगट आणि शैलीच्या आधारे निवडक 121 चित्रांचे पुस्तक तयार करण्यात आले आहे.

(हेही वाचा Udaynidhi Stalin : उदयनिधी स्टॅलिन आता राम मंदिरावर बरळले; म्हणाले, ”मशीद पाडून मंदिर बांधणे अमान्य…” )

रामायणातील रामाचा जन्म, बालपण, विश्वामित्रांच्या आश्रमातील भावंडांसमवेत शिक्षण, सिता स्वयंवर, वनवासातील काळ, शूर्पणखेचे गर्वहरण, सुग्रीव, बाली यांची साथ, हनुमानाची भक्ती, सिता-हनुमान यांची अशोकवनातील भेट, बिभिषणाची भेट, कुंभकर्णाशी लढाई, रावण वध आणि अयोध्येतील स्वागत असे विविध प्रसंग चित्रबद्ध करण्यात आले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.