International Space Station: अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परतण्यास विलंब, कारण काय?

105
International Space Station: अंतराळवीर सुनीता विल्यम्स अवकाशात अडकल्या, कारण काय?
International Space Station: अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परतण्यास विलंब, कारण काय?

अंतराळवीर सुनीता विल्यम्स त्यांच्या एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या. यासह या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (International Space Station) जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले. अशा मोहिमेवर उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला म्हणूनही विल्यम्स यांनी इतिहास घडवला. पण, आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

आता त्यांना ISSमधून (International Space Station) परत येण्यात अडचण येत आहे. अंतराळयानामधील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना पृथ्वीवर परत येण्यास विलंब होत आहे. लवकरच अंतराळ यानातील तांत्रिक अडचणी सोडवून ते पृथ्वीवर परत येतील, असं अभियंत्यांनी सांगितलं आहे.

(हेही वाचा – जम्मूमध्ये २६ जूनपर्यंत उष्णतेची लाट; Monsoon राज्य कधी व्यापणार? काय म्हणतयं हवामान खातं?)

अंतराळवीरांना परत आणण्यासाठी …
भारतीय वंशाच्या बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने ISSवर पोहोचले होते. स्टारलाइनर स्पेसक्राफ्टचे रिटर्न मॉड्यूल आयएसएसच्या हार्मनी मॉड्यूलमध्ये फक्त मर्यादित इंधन शिल्लक आहे. स्टारलाइनमध्ये ५ ठिकाणांहून हेलियम गळतीमुळे परतीचा प्रवास सुरू होऊ शकलेला नाही. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, स्टारलाइनरकडे ५ थ्रस्टर्स आहेत त्यांनी काम करणे थांबवले होते. दरम्यान, सोशल मीडियावर वापरकर्ते म्हणत आहेत की, स्टारलाइनरने केलेला अंतराळ प्रवास अत्यंत धोकादायक आहे. आता अंतराळवीरांना परत आणण्यासाठी SpaceX पाठवले जाणे आवश्यक आहे. अंतराळवीर जोनाथन मॅकडॉवेल म्हणाले की, काही थ्रस्टर्स अयशस्वी झाले तरीही २ अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येऊ शकतात. या छोट्या समस्यांमुळे लँडिंगमध्ये काही फरक पडणार नाही.

हेलियमची गळती?
दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर, बोईंग स्टारलाइनर ५ जून रोजी दोन्ही अंतराळवीरांसह रवाना झाले. २५ तासांच्या प्रवासादरम्यान अंतराळ यानात ५ ठिकाणांहून हेलियमची गळती होत असल्याचे आढळून आले. ५ थ्रस्टरने काम करणे थांबवले होते. बोईंग स्टारलाइनर प्रोग्रामच्या व्यवस्थापकाने स्वतः सांगितले की, त्यांची हीलियम प्रणाली तयार केल्याप्रमाणे काम करत नाही. अभियंत्यांनाही ही समस्या काय आहे हे माहीत नाही. ते या समस्येवर उपाययोजना शोधत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.