अंतराळ क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि अमेरिका अनेक पावले उचलणार आहेत. अमेरिकन अंतराळ संस्था (नासा) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात राहण्यासाठी प्रशिक्षण देईल. नासाचे प्रशासक बिल नेल्सन (International Space Station) यांनी यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात बिल नेल्सन म्हणाले की, क्रिटिकल अँड ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीला (आयसीईटी) प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र पुढे जातील. गेल्या वर्षी आम्ही भारतात गेलो होतो. मानवतेच्या भल्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र काम करण्यास तयार आहेत. आम्ही अंतराळ क्षेत्रात एकत्र काम करू आणि इस्रोच्या एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जाण्यासाठी, तिथे राहण्यासाठी आणि परत येण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे भविष्यात अवकाश विज्ञानाला प्रगती होण्यास मदत होईल. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे जेक सुलिव्हन यांच्यातील बैठकीनंतर नेल्सन यांनी ही सर्व माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. इस्रोच्या अंतराळवीरांना प्रगत प्रशिक्षण दिले जाईल, असे सुलिव्हन यांनी सोमवारी म्हंटले होते.
(हेही वाचा – David Johnson Death : भारताचा माजी कसोटीपटू डेव्हिड जॉनसनच निधन)
हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी अभियान…
बिल नेल्सन म्हणाले की, नासा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भारतीय अंतराळवीरांसोबत संयुक्त मोहिमेचे आयोजन करेल. नासाने अंतराळ उड्डाण सहकार्य आणि धोरणात्मक फ्रेमवर्कच्या विकासासाठी चर्चा केली. नासा आणि इस्रोच्या अंतराळवीरांचा हा पहिलाच संयुक्त प्रयत्न असेल. या वर्षाच्या अखेरीस भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणासाठी इस्रो 4 अंतराळवीरांची निवड करू शकते. नासा आणि इस्त्रो मिळून इस्त्रो सिन्थेटिक एप्चर रडार (एनआयएसएआर) लॉन्च करणार आहेत. हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरू शकते. ते दर १२ दिवसांनी दोनदा पृथ्वीचा नकाशा तयार करेल. जेक सुलिवन आणि एनएसएस अजित डोवाल यांच्यातील चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे. हा उपग्रह नासा आणि इस्रोने संयुक्तपणे तयार केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community