पुणे-मुंबईतील आकाशात पहायला मिळाले International Space Station

89
पुणे-मुंबईतील आकाशात पहायला मिळाले International Space Station
पुणे-मुंबईतील आकाशात पहायला मिळाले International Space Station

पृथ्वीवरून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक कोणत्याही दुर्बिणीशिवाय नुसत्या डोळ्यांनीही पहाण्याची दुर्मिळ संधी रविवार, २ फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी पुणे-मुंबईतील रहिवाशांना मिळाली. कोणत्याही दुर्बिणीशिवाय थेट आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक (International Space Station) पाहण्याचा योग जुळून आला. याच अवकाश स्थानकात भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) व बुच विल्मोर (Barry Wilmore) सध्या वास्तव्यास आहेत.

(हेही वाचा – Accident News : कर्मचारी गोव्यावरून सहलीहून परतताना भीषण अपघात; 1 ठार 30 जखमी)

रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अवकाशात पश्चिमेकडे गोष्ट वेगाने जाताना पाहायला मिळाली. ही गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक होते ! “या काळात हे स्थानक अर्थात ISS क्षितिजाच्या १० अंश वरून जात असेल आणि नुसत्या डोळ्यांनी स्पष्टपणे पहायला मिळेल”, अशी माहिती आधीच मुंबईतील नेहरू प्लॅनेटोरियमचे (Nehru Planetarium) संचालक अरविंद परांजपे यांनी दिली होती. हे यान साधारणपणे पहाटे किंवा संध्याकाळी उशिराच्या वेळी अवकाशात दिसू शकते. दिवसा सूर्याच्या प्रकाशात प्रकाशित झालेलं असल्यामुळे हे स्थानक अवकाशातून जाताना लगेच दिसून येत नाही. पण यावेळी ते संध्याकाळच्या वेळी जाणार होतं. त्याबाबत आधीच माहिती प्रसारित करण्यात आली होती. त्यानुसार अनेक खगोलप्रेमींनी हे स्थानक अवकाशातून जाताना पाहिले.

अवकाश स्थानकाचे भ्रमण कसे असते ?

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे पृथ्वीपासून साधारणपणे ४०० किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वीवरून सोडण्यात येणारे उपग्रह साधारणपणे पृथ्वीपासून ३६ हजार किलोमीटर अंतरावर परिक्रमा करत असतात. अवकाश स्थानक अर्थात ISS हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे दिवसाच्या वेगवेगळ्या भागात ते जगभरातल्या वेगवेगळ्या देशांवरून जात असतं. या स्थानकाचा पृथ्वीभोवती परिक्रमा करण्याचा वेग ७ किलोमीटर प्रतिसेकंद इतका असतो. त्यामुळे अवघ्या ९० ते १०० मिनिटांत ते पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. एका दिवसात साधारणपणे १६ प्रदक्षिणा हे स्थानक पृथ्वीभोवती करत असते. साधारणपणे २ ते ३ फूटबॉल स्टेडियमइतका या स्थानकाचा आकार आहे. त्याचे वजन जवळपास ४०० टन इतके आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.