महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग अत्यावश्यक

109

नुकताच महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न करणार्‍या सर्व शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था तसेच व्यक्तींनी जागतिक महिला दिन साजरा केला. परंतु महिलांना भेडसावणार्‍या समस्या कमी झाल्याचे काही दिसत नाही. मुलगी म्हणून होणार्‍या भ्रूण हत्या, लहान मुलींचा पैशासाठी आंतरजाला मार्फत होणारा व्यापार, मुलींची छेडछाड, महिलांवरील बलात्कार, हुंड्यासाठी छळवणूक, घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी दिला जाणारा त्रास, महिलांचा मानसिक छळ, विधवा महिलांना सोसाव्या लागणार्‍या आर्थिक हालअपेष्टा, वृद्ध महिलांची होणारी उपेक्षा, महिलांविरुद्ध होणारे आार्थिक व सायबर गुन्हे अशा अनेक प्रकारे महिलांना सतत त्रास होत असतो. त्याशिवाय, महिला म्हणून होणारी उपेक्षा, पुरुषांच्या तुलनेत असमान वागणूक ह्यांनाही महिलांना सतत तोंड द्यावे लागते.

महिलांवर होणारे गुन्हे व भेदभाव पूर्ण वागणूक ह्याविरुद्ध शासन नेहमीच संवेदनाशील राहिले आहे व सतत त्यासाठी कठोर निर्बंध (कायदे) करण्यात आले आहेत.  महिलांसाठी toll free 112 India app & for cyber complaints 1930  सुरु करण्यात आल्या आहेत. असे असूनही महिलांविरुद्धचे गुन्हे दरवर्षी वाढत आहेत. त्याची कारणे काय आहेत ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. महिलांविरुद्ध दाखल होणारे गुन्हे हे प्रत्यक्षात महिलांवर होणार्‍या अत्याचारांच्या तुलनेत नगण्य असतात. महिला श्रीमंत असोत अथवा गरीब, लहान असोत किंवा मोठ्या, कोणत्याही धर्माच्या किंवा जातीच्या त्या ह्या अत्याचारांमुळे पीडित असतात. पण तरीही घरातील व्यक्तींच्या दबावामुळे, आजुबाजूस राहणार्‍या लोकाकडून होणार्‍या प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष टीकेमुळे, लाजेमुळे महिला आपल्यावरील झालेले गुन्हे उघड करायला धजावत नाहीत व त्यामुळे अत्याचारांची व्यथा आयुष्यभर सहन करीत राहतात व गुन्हेगाराना भीत राहतात. त्याच बरोबर, अन्याय करणारे गुन्हेगार मात्र उजळ माथ्याने फिरत राहतात व असे अनेक अन्याय करण्यास निर्ढावतात.

(हेही वाचा राज्यातील तहसीलदार, जिल्हाधिकारी संपावर; कामे रखडली)

पीडित महिलांनी गुन्हे दाखल करण्यासाठी तसेच न्यायालयात आरोपी विरुद्ध साक्ष देण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच पोलिस मित्रांनी पुढे येउन मदत करण्याची मोठी गरज आहे. Digitisation चा फायदा घेउन महिलांना त्यासंबंधी सक्षम करण्याची मोठी गरज अहे. त्यामुळे गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणातही वाढ होईल. आज अनेक मोठ्या शहरात CCTV लावण्यात आले आहेत. त्यांचा उपयोग करून गुन्हे होण्यापूर्वीच पोलिस अधिकार्‍यांनी त्यांची नोंद घेउन गुन्हेगारावर कारवाई करणे अपेक्षित आहे.  Artificial intelligence चा वापर करून त्वरित सूचना देण्याचीही सोय लवकरच करण्यात येणार आहे. रुग्णालये, शाळा, बागा, कामाची ठिकाणे ह्या ठिकाणी CCTV लावण्याने तिथे होणार्‍या गुन्ह्यांना खूपच चाप बसला आहे. परंतु, घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यात मात्र सतत वाढ होत आहे. घराण्याचा अपमान झाला ह्या नावाखाली घरातील बाप, भाउ मुलीची हत्या करताना आढळतात. तसेच कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक छळाची प्रकरणेही वाढत आहेत.  Cyber गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. एका क्षणात पूर्ण आयुष्याची कमाई नाहीशी झाल्यामुळे लोकांमध्ये नैराश्य येऊन लोक आत्महत्या करत आहेत. त्यामुळे ह्या गुन्ह्यांचा तपास अत्यंत तातडीने होणे आवश्यक आहे. बर्‍याच वेळा हे गुन्हे कामाच्या वेळेनंतर होतात, हे लक्षात घेऊन cyber help lines रात्रीही चालू ठेवणे जरूरीचे आहे. Cyber गुन्हे म्हणजे दहशतवादाचे गुन्हे असे इंग्लंडमध्ये नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. भारतात ही त्याप्रमाणे कारवाई अपेक्षित आहे.

(हेही वाचा शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ; युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.