पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावानंतर असा साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय योग दिवस

योग हा शरीर, मन, चेतना आणि आत्मा यांना संतुलनात आणतो. शरीराला तंदुरूस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. त्यामुळे योग जीवनात फार महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला ते जाणून घेऊया.

म्हणून 21 जून हाच दिवस निवडला

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव युनायटेड नॅशनल जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात भाषण देताना दिला होता. या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे ते मन आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतीक आहे मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद, विचार, संयम, पूर्तता आणि आरोग्य कल्याणासाठी पूरक आहे. योग आपल्याला स्वत:चा शोध घेण्यास आणि निसर्गाशी जोडण्यास मदत करते. आपल्या बदलत्या जीवनशैलीत योगाभ्यास समाविष्ट करण्याच्या दृष्टीने जागतिक योग दिवस साजरा करावा आणि योग साधनेसंबंधी जनजागृती करावी” नरेंद्र मोदींनी दिलेला हा प्रस्ताव बहुमताने 11 डिसेंबर 2014 रोजी स्वीकरण्यात आला आणि 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. 2015 रोजी योग दिनाची सुरुवात झाली आणि त्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.

( हेही वाचा: Amazon Prime, Hotstar,NetFlix मोफत हवंय? तर Jio देतंय हे भन्नाट प्लान )

अन् विश्वविक्रम नोंदवण्यात आला

सर्वात कमी कालावधीत पूर्ण बहुमताने मंजूर होणारा तो पहिला प्रस्ताव ठरला. या उपक्रमाला अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला. (International Yoga Day 2022) 21 जून 2015 रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मान्यवरांसह 35 मिनिटांसाठी 21 योगासने केली. या समारंभाने गिनीज बुकमध्ये विश्वविक्रम नोंदवला गेला. पंतप्रधानांच्या सक्रिय उपस्थितीमुळे योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि जगभरात लाखो लोकांनी योग दिवस साजरा केला आणि आनंदाची बाब म्हणजे आजही हा दिवस तितक्याच उत्साहाने सर्वत्र साजरा होतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here