International Yoga Day 2024 : आश्चर्य ! पंतप्रधान मोदींनी दिले योगाचे धडे, ‘X’वर शेअर केलेले Video पाहा

व्हिडियोमध्ये योगाचे विविध प्रकार मोदींच्या डिजिटल रुपातील प्रशिक्षकाने शिकवले आहेत.

137
International Yoga Day 2024 : आश्चर्य ! पंतप्रधान मोदींनी दिले योगाचे धडे, 'X'वर शेअर केलेले Video पाहा

देशभरात जागतिक योग दिन शुक्रवार, २१ जून रोजी साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी २०१४ साली पदभार स्वीकारल्यानंतर जागतिक योग दिनाची सुरुवात केली. म्हणजे अवघ्या १० दिवसांतच देशभरातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडवणारा तसेच प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा ‘योग दिन’ साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांनी योगाला आपल्या आयुष्यात अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन करत यासंदर्भातील एक पोस्ट केली आहे. (International Yoga Day 2024)

मोदी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर म्हटले आहे की, ‘आतापासून १० दिवसांनी जग दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करेल. यामुळे एकता आणि सुसंवाद साजरा होईल. योगाने सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमा ओलांडल्या आहेत आणि जगभरातील लाखो लोकांना सर्वांगीण कल्याणासाठी एकत्र केले आहे.’ (International Yoga Day 2024)

”जसे आपण या वर्षीच्या योग दिनाजवळ येत आहोत, योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करणे आवश्यक आहे आणि इतरांनाही त्याचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. योग हे शांततेचे अभयारण्य आहे. जे आपल्याला जीवनातील आव्हानांविरोधात शांततेने आणि धैर्याने लढण्यास सक्षम करते”, असंही मोदी म्हणाले.

डिजिटल रुपातील योग प्रशिक्षक…
मोदी आवाहन करून थांबले नाहीत, तर त्यांच्या डिजिटल रुपातील योग प्रशिक्षकाचे व्हिडिओही त्यांनी प्रदर्शित केले आहेत. या व्हिडियोमध्ये योगाचे विविध प्रकार मोदींच्या डिजिटल रुपातील प्रशिक्षकाने शिकवले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.