दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि ॐ दादर योग सेंटर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षा प्रमाणे ह्या वर्षीही स्मारकाच्या प्रांगणात जागतिक योग दिवसाचे आयोजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, २१ जून २०२३ ह्या दिवशी सकाळी ७ ते ९ ह्या कालावधीत होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी होऊन हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक योग दिवसानिमित्त गेली अनेक वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि ॐ दादर योग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने योग वर्गातील साधक सर्वांच्या आरोग्यासाठी रक्त तापसणी केली जाते. ही रक्त तपासणी दादर येथील डॉ. अविनाश फडके यांच्या रक्त तपासणी केंद्रातर्फे होत असते. या वर्षी सर्व लोकांच्या सोयीसाठी ही रक्त तपासणी शनिवार, २४ जून २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.०० या कालावधीत होणार आहे. या रक्त तपासणीसाठी अंदाजे ५,५०० रुपये शुल्क आकारले जाते. जागतिक योग दिनानिमीत्त डॉ. अविनाश फडके ह्यांची प्रयोग शाळा १,२०० रुपये आकारणार आहे.
(हेही वाचा Muslim : हिजाबची सक्ती आणि धर्मांतर करणाऱ्या ‘या’ राज्यातील शाळांवर चालणार बुलडोझर )
ह्या रक्त तपासणी अंतर्गत CBC, TSH, VITB12, VITD3 CREATININE, HBA1C, LIPID या चाचण्या केल्या जातील. त्यासाठी एक छापील नमूना (फॉर्म) भरून देणे आवश्यक आहे. हा छापील नमूना योग वर्गाच्या वेळेत सकाळी ७.०० ते ८.३० या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात उपलब्ध होत आहे.
Join Our WhatsApp Community