International Yoga Day: जगातील वरिष्ठ नेते जेव्हा संधी मिळते तेव्हा माझ्याशी योगाविषयी चर्चा करतात, पंतप्रधान योग कार्यक्रमानिमित्त म्हणाले…

हा कार्यक्रम सकाळी साडेसहा वाजता एसकेआयसीसीच्या मागील अंगणात कॉमन योग प्रोटोकॉल अंतर्गत सुरू होणार होता, परंतु पावसामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला.

125
International Yoga Day: जगातील वरिष्ठ नेते जेव्हा संधी मिळते तेव्हा माझ्याशी योगाची चर्चा करतात, पंतप्रधान योग कार्यक्रमानिमित्त म्हणाले...
International Yoga Day: जगातील वरिष्ठ नेते जेव्हा संधी मिळते तेव्हा माझ्याशी योगाची चर्चा करतात, पंतप्रधान योग कार्यक्रमानिमित्त म्हणाले...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवारी, (२१ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील दल सरोवराच्या काठावर काही योगा केला. यावर्षी १०वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. यावेळी पंतप्रधानांनी सांगितले की, योगाचा प्रवास सुरूच आहे. आज जगात योगा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. योगा हे केवळ ज्ञानच नाही, तर शास्त्रही आहे.

असे सांगून ते पुढे म्हणाले की, आज माहिती संसाधनांचा पूर आला आहे. अशा परिस्थितीत एका विषयावर लक्ष केंद्रित करणे कठीण होत आहे. त्याचे समाधान योगामध्ये आहे.

(हेही वाचा – Accident: नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ३ वाहनांचा अपघात, २० हून अधिक प्रवासी जखमी)

हा कार्यक्रम सकाळी साडेसहा वाजता एसकेआयसीसीच्या मागील अंगणात कॉमन योग प्रोटोकॉल अंतर्गत सुरू होणार होता, परंतु पावसामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला. SKICCच्या सभागृहात पंतप्रधान मोदींसह इतरांनी योगा करण्याचा लाभ घेतला. पंतप्रधानांसोबत ५० लोकं उपस्थित होते. पाऊस पडला नसता, तर हा कार्यक्रम मोकळ्या जागेत आयोजित केला असता. जिथे जवळपास ७ हजार लोक पंतप्रधानांसोबत योगा करताना दिसले असते. काही लोकांना विविध आसनांचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

‘स्व आणि समाजासाठी योग’
१० वर्षांपूर्वी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला होता. तेव्हापासून तो वेगवेगळ्या थीमवर साजरा केला जात आहे. २०२४च्या योग दिनाची थीम ‘स्व आणि समाजासाठी योग’ आहे.

सकारात्मक संदेश
पंतप्रधान मोदी २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. २०१३ पासून त्यांचा हा २५वा जम्मू-काश्मीर दौरा आहे. २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर ही सातवी भेट आहे. निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी करत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदींची येथे भेट आणि योग दिनासारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणे हा सकारात्मक संदेश मानला जात आहे.

योगाभ्यासाचा अवलंब
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान म्हणाले, जगातील सर्व वरिष्ठ नेते जेव्हाही संधी मिळते तेव्हा माझ्याशी योगाची चर्चा करतात. योगा जगातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनत आहे. सौदी अरेबियाने त्याचा शिक्षण व्यवस्थेत समावेश केला आहे. जर्मनीमध्ये १.५ कोटी लोकांनी योगाभ्यासाचा अवलंब केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.