Internet Explorer 15 जूनपासून होणार बंद; त्याची जागा आता ‘हे’ आधुनिक ब्राउझर घेणार

90

15 जून 2022 पासून Internet Explorer बंद होणार आहे. हे Web Browser बंद करण्याचा निर्णय Microsoft कंपनीने घेतला आहे. आता या जागी Microsoft Edge हे नवे Browser येणार असल्याची घोषणा मायक्रोसाॅफ्ट कंपनीने केली आहे.

इंटरनेट एक्सप्लोररची सेवा मायक्रोसाॅफ्ट एजमध्ये उपलब्ध असेल. मायक्रोसाॅफ्ट कंपनीने सांगितले आहे की, विंडोज 10 वरील इंटरनेट एक्सप्लोरर सेवा आता मायक्रोसाॅफ्ट एजमध्ये उपलब्ध असेल. मायक्रोसाॅफ्ट एज हा इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा वेगवान, अधिक सुरक्षित आणि आधुनिक ब्राउझर आहे.

( हेही वाचा: Employment India: 10 लाख सरकारी पदांसाठी भरती; पंतप्रधानांनी केली मोठी घोषणा )

इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याचा निर्णय

मायक्रोसाॅफ्ट कंपनीने 2016 मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर वेब ब्राउझर अपडेट करणे बंद केले. मायक्रोसाॅफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याचा निर्णय घेतला. मायक्रोसाॅफ्टच्या या निर्णयाचा लोकांवर फारसा परिणाम होणार नाही, कारण लोक आधीच इतर वेब ब्राउझर वापरत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.