अलिकडे महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे गुंतवणूक करणे अतिशय गरजेचे असते. परंतु गुंतवणूक कुठे करावी यासंदर्भात अनेक जणांना माहिती नसते पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना गुंतवणूकीसाठी सुरक्षित मानल्या जातात. याशिवाय सरकारच्या पाठिंब्यामुळे सामान्य लोकांचा सुद्धा या योजनांवर अधिक विश्वास असतो. आम्ही तुम्हाला पोस्टाच्या ( Post Office) मासिक उत्पन्न योजनेविषयी माहिती देणार आहोत…
( हेही वाचा : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना ‘हे’ अॅप्स वापरण्यास बंदी)y
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत वार्षिक ६.६ टक्के व्याज मिळते ही योजना ५ वर्षांनी mature होते. म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळेल आणि जर खातेदाराचा मॅच्युरिटीपूर्वी मृत्यू झाला तर पैसे नॉमिनीला दिले जातील. पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत फक्त १ हजार रुपयांमध्ये खाते उघडता येते.
किती मिळणार मासिक उत्पन्न?
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत जर एखाद्या गुंतवणूकदाराने ९ लाखांची गुंतवणूक केली तर त्याला वार्षिक ६.६ टक्के दराने ५९ हजार ४०० रुपये मिळतील. ही केवळ व्याजाची रक्कम आहे. गुंतवणूकदाराची मूळ रक्कम तेवढीच राहील.
कोण गुंतवणूक करू शकते
- १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत एक व्यक्ती एका खात्यात जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये आणि join खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये गुंतवू शकते.
- एका वर्षापूर्वी ही रक्कम काढू शकत नाही.
- मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर पैसे काढले तर तुम्हाला या योजनेचे पूर्ण फायदे मिळतील.