फक्त 2 रुपये गुंतवा आणि 36 हजार रुपये पेन्शन मिळवा, केंद्र सरकारची भन्नाट योजना

85

निवृत्तीनंतरही आर्थिक गरज भागवण्यासाठी निवृत्त नोकरदारांना पैशांची गरज भासते. त्यामुळे भविष्याची तरतूद करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो. आता पीएफ धारक किंवा पेन्शनधारकांना निवृत्तीनंतर मिळणा-या पैशांची चिंता नसते. पण ज्यांना या दोन्ही गोष्टींचा लाभ मिळत नाही अशा कंत्राटी किंवा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारकडून एक अनोखी योजना सुरू करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना असे या योजनेचे नाव असून असंघटित क्षेत्रातील कामगार यामध्ये पैसे गुंतवून आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य टेन्शन फ्री जगू शकतात. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून असंघटित क्षेत्रातील कर्मचा-यांना पेन्शनचा लाभ घेता येतो. दररोज केवळ 2 रुपये जमा करुन वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन मिळवून देणारी ही योजना आहे.

(हेही वाचाः EPFO: PF खातेधारकांना मिळतंय 7 लाखांचं विमा संरक्षण, असा घ्या लाभ)

कमवा दरमहा 3 हजार

18व्या वर्षी ही योजना सुरू करणा-या नागरिकाला या योजनेंतर्गत दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच दिवसाला दोन रुपयांपेक्षा कमी रक्कम कर्मचा-यांना या योजनेत गुंतवायची आहे. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षी ही योजना सुरू केली तर त्या व्यक्तीला दरमहा 200 रुपये रक्कम जमा करावी लागेल. या योजनेचा लाभ वयाच्या 60व्या वर्षानंतर मिळायला सुरुवात होईल. साठीनंतर व्यक्तीला दरमहा 3 हजार रुपये म्हणजेच वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेच्या माध्यमातून मिळेल. यासाठी व्यक्तीचे आधार कार्ड बँक अकाऊंट असणे गरजेचे आहे.

असे करा रजिस्ट्रेशन

कॉमन सर्व्हिस सेंटर(CSC) मधील कामगार पोर्टलवर या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर या योजनेत गुंतवणूक करण्याची सर्व माहिती सरकारकडे नोंदवण्यात येईल. रजिस्ट्रेशन करण्यासाठी व्यक्तीचे आधार कार्ड,बचत खाते किंवा जनधन खाते अकाऊंटचे पासबूक,मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. तसेच बँक अकाऊंटमधून या योजनेसाठी पैसे वजा करायला एक संमतीपत्र देखील आपल्या बँकेला सादर करावे लागेल. जेणेकरुन वेळच्या वेळी तुमच्या अकाऊंटमधून या योजनेत पैशांचा भरणा केला जाईल.

(हेही वाचाः EWS आरक्षणासाठी कोण असणार पात्र? वाचा संपूर्ण निकष)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.