Reasi Bus Attack : रियासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास अजूनही सुरू

Reasi Bus Attack : पोलीस, लष्कर व निमलष्करी दलाची ११ पथके कामाला लागली आहेत. त्यासाठी पोनी-तिरेथ भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेराबंदी करण्यात आली आहे.

108
Reasi Bus Attack : रियासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास अजूनही सुरू
Reasi Bus Attack : रियासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचा तपास अजूनही सुरू

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) रियासी (Reasi Bus Attack) जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध मंगळवार, ११ जून रोजीही सुरू राहिला. त्यासाठी पोलीस, लष्कर व निमलष्करी दलाची ११ पथके कामाला लागली आहेत. त्यासाठी पोनी-तिरेथ भागामध्ये मोठ्या प्रमाणात घेराबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती उधमपूर-रियासी रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक रईस मोहम्मद भट यांनी दिली आहे. हे दहशतवादी रियासी आणि राजौरीच्या डोंगराळ जंगल भागात लपल्याचा संशय आहे.

(हेही वाचा – लेफ्टनंट जनरल Upendra Dwivedi होणार नवीन लष्करप्रमुख; 30 जूनला पदभार स्वीकारणार)

दहशतवाद्यांनी रविवारी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर गोळीबार केला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळून नऊ जण ठार, तर ४१ जखमी झाले. ही बस कटरामधील वैष्णोदेवी (Vaishno Devi) मंदिराकडे जात होती. या बसमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीचे यात्रेकरू होते.

या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) तीन दहशतवादी सहभागी असल्याचा संशय आहे. मात्र, जखमी यात्रेकरूंनी नोंदवलेल्या जबाबावरून चौथ्या दहशतवाद्याचा सहभाग असल्याची शक्यता आहे. लष्कर-ए-तैयबाचा कमांडर अबू हमझाच्या आदेशावरून हल्ला झाल्याचा संशय आहे.

सीमा बंद नाहीत

जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेची परिस्थिती चांगली असली, तरी पाकिस्तानबरोबरची (Pakistan) सीमा पूर्णपणे बंद नाही. सीमेवर प्रत्येक ठिकाणी नियंत्रण ठेवणे शक्य नाही. त्यामुळे दहशतवाद अजूनही जिवंत आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. (Reasi Bus Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.