Investing in Gold : यंदाही सोन्याच्या गुंतवणुकीतून २० टक्के परतावा शक्य असल्याचा संशोधन संस्थांचा अंदाज

Investing in Gold : जागतिक अस्थिरतेचा फायदा सोन्याला मिळणार आहे.

67
Investing in Gold : यंदाही सोन्याच्या गुंतवणुकीतून २० टक्के परतावा शक्य असल्याचा संशोधन संस्थांचा अंदाज
  • ऋजुता लुकतुके

जगभरातील अस्थिर भूराजकीय परिस्थिती, वाढती महागाई आणि तेलाच्या अनियमित मागणीचा परिणाम जगातील सर्वच प्रमुख अर्थव्यवस्थांवर होत आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याची झळाळी मात्र सलग दुसऱ्या वर्षी वाढेल असा गुंतवणूक तज्जांचा अंदाज आहे. तर भारतात सोनं मुख्यत्वे आयात होतं. ते आणण्यासाठी बरंचसं परकीय चलनही खर्च होतं. पण, देशातील मागणी मात्र सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव २०२५ मध्येही चढेच असतील असा अंदाज आहे. (Investing in Gold)

भारत आणि चीनमध्ये सोन्याची मागणी या कालावधीत वाढेल, असा जाणकारांचा होरा आहे. जगात एनएचपीव्ही विषाणूची भीतीही सध्या डोकावत आहे. अशावेळी नवीन आर्थिक संकट जगावर घोंघावत आहे. ही अनिश्चितताही सोन्याच्या वाढीला पोषक आहे. सोन्याच्या वाढत्या दरामागील कारणे, (Investing in Gold)

(हेही वाचा – Border-Gavaskar Trophy : ‘तुम्ही काय करत होता?’ गावस्करांनी उपटले प्रशिक्षकांचे कान)

  • जागतिक संघर्ष आणि नवीन उद्भवणारे भू-राजकीय तणाव यांसारख्या जगभरात चालू असलेल्या अनिश्चिततेमुळे सोन्यावरील विश्वास वाढत चालला आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोन्याकडे पाहत आहेत.
  • भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेत मध्यवर्ती बँका सक्रियपणे त्यांच्या सोन्याचा साठा वाढवत आहेत. २०२५ मध्ये हा कल कायम राहील, सोन्याच्या किमतीला मजबूत आधार मिळेल.
  • अमेरिकेत ट्रंप प्रशासन २० जानेवारीपासून सुरू होईल. त्यांच्या धोरणांविषयी सध्या अनिश्चितता आहे. अशावेळी लोकांना सोन्याबद्दलचा विश्वास वाढला आहे.
  • या परिस्थितीत, आमचा अंदाज आहे की MCX वर सोन्याची किंमत वायदे बाजारात ₹ ८५ हजार प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचू शकते.
  • आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सोन्याच्या आयातीत ९% कपात झाल्यामुळे भारतातील दागिन्यांची मागणी १८% वाढली आणि यावर्षी ही वाढ १४ ते १८% इतकी असेल.
  • भारतीय सराफा बाजारांचा विस्तार आता दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये होत आहे. तिथे आधीच्या तुलनेत सोन्याची मागणी वाझत आहे. ब्रँडेड दागिन्यांना त्यामुळे मागणी वाढेल.
  • देशातील सोन्याचे कर्ज गेल्या वर्षी विक्रमी ५६ टक्क्यांनी वाढून १.५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सोने गहाण ठेवून खरेदी करण्याचा कल यंदा आणखी वाढणार आहे. या वर्षी सोन्याचे कर्ज जवळपास सात पटीने वाढू शकते आणि १० लाख कोटी रुपयांचा बेंचमार्क ओलांडू शकते. (Investing in Gold)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.