अयोध्येतील (Ayodhya) रामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात फक्त रामभक्तांनाच निमंत्रण दिले आहे, अशा शब्दांत रामलल्लांचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले. (Rammandir Pran Pratishtha) ‘या सोहळ्याची निमंत्रणे फक्त रामभक्तांना पाठवण्यात आली आहेत’, असे मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी राज्यसभा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावरही निशाणा साधत त्यांच्यावर भगवान रामाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
(हेही वाचा – Billionaire’s Day Out : मुंबईच्या ‘या’ अब्जाधीशाने केला वेळ वाचवण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास )
22 जानेवारीला अयोध्येतील राममंदिरात (Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. राममंदिरातील प्रतिष्ठापना विधीची तयारी एकीकडे उत्साहात चालू आहे. देशभर त्यावरून राजकारणही तापले आहे. उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले नसल्याने ठाकरे गट टीका करत आहे. ‘तिथे जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. रामलल्ला कोणत्याही पक्षाची मालमत्ता नाही, तो सर्वांचा आहे’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यावरून राममंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनीही खडे बोल सुनावले आहेत.
(हेही वाचा – Ind vs SA 2nd Test : भारतीय संघ ‘अशी’ करतोय दुसऱ्या कसोटीची तयारी )
ते प्रभु रामाचा अपमान करत आहेत – श्री आचार्य सत्येंद्र दास
”जे रामाचे भक्त आहेत, त्यांनाच निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP) भगवान रामाच्या नावाने लढत आहे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्या पंतप्रधानांना सर्वत्र आदर मिळत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात बरीच कामे केली आहेत. हे राजकारण नाही. हे त्यांचे समर्पण आहे. ‘संजय राऊत यांना इतके दुःख झाले आहे की, ते व्यक्तही करू शकत नाहीत. त्यांनीच प्रभु रामाच्या नावाने निवडणूक लढवली होती. जे प्रभु रामाला मानतात, जे सत्तेत आहेत, ते कसले बकवास बोलत आहेत ? ते प्रभु रामाचा अपमान करत आहेत,” असे श्री आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community