iPhone 16 : आयफोन १६ च्या किमती उतरल्या, आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किमतीला मिळतोय हा फोन

iPhone 16 : रिपब्लिक डे सेलमध्ये आयफोन १६ वर सवलत मिळत आहे.

156
iPhone 16 : आयफोन १६ च्या किमती उतरल्या, आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किमतीला मिळतोय हा फोन
  • ऋजुता लुकतुके

आयफोनच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. कंपनीचा सगळ्यात नवीन आयफोन १६ (iPhone 16) हा फोन फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन या आघाडीच्या ई-कॉमर्स साईटवर सवलतीच्या दरात मिळत आहे. रिपब्लिक डे सेलच्या अंतर्गत हे सवलतीचे दर लागू असून आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किमतीत तुम्हाला आयफोन १६ मिळू शकेल.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाच्या फोटोशूटसाठी रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार का?)

फ्लिपकार्ट वि. ॲमेझॉन

फ्लिपकार्ट मॉन्युमेंटल सेल – आयफोन १६ (१२८ जीबी) – रु. ६९,९९९ (मूळ किंमत ७९,९९९)

आयफोन १६ प्लस (१२८ जीबी) – रु. ७९,९९९ (मूळ किंमत ८९,९९९)

ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल – आयफोन १६ (१२८ जीबी) – ७४,९००

आयफोन १६ प्लस (१२८ जीबी) – ८४,९००

(हेही वाचा – Vande Bharat Sleeper ट्रेनची ट्रायल रन यशस्वी)

या दोन्ही कंपन्यांमध्ये फ्लिपकार्टवर नक्कीच जास्त सवलत मिळत आहे. तुम्ही १०,००० रुपयांच्या सवलतीत इथं आयफोन १६ चं स्वप्न पूर्ण करू शकताय. पण, ॲमेझॉनवरही तुम्ही काही ठरावीक कार्डचा वापर करून आणखी सवलत मिळवू शकता. आयफोन १६ (iPhone 16) मध्ये कंपनीने आधीच्या मॉडेलच्या तुलनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला हा पहिला ॲपल फोन असेल. कंपनीने ॲपल एआय टूल विकसित केलं आहे आणि त्यामुळे फोन वापरण्याचा अनुभवही बदलणार आहे. फोनमधील पर्सनलायझेशन, ॲप वापरण्यातील सुटसुटीतपणा आणि व्हॉईस कमांडची सोय आता जास्त आधुनिक झाली आहे.

तर फोनमधील कॅमेराही बदलला असून कमी प्रकाशातही स्पष्ट फोटो तसंच जास्त क्षमतेची लेन्स नवीन फोनमध्ये वापरण्यात आली आहे. त्यामुळे आयफोन १५ च्या तुलनेत आयफोन १६ (iPhone 16) चा अनुभव जास्त चांगला आहे. कंपनीचा हा फोन ए१८ चिपवर आधारित आहे. आणि त्यामुळे फोनचा वापर अधिक गतीमान आणि मल्टीटास्किंग अधिक सोपं होणार आहे. गेमिंगचा चांगला अनुभव तुम्हाला आयफोन १६ मध्ये मिळेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.