- ऋजुता लुकतुके
ॲपल कंपनीच्या वार्षिक माडिया कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्यांनाच असते. कारण, त्यादिवशी कंपनीची नवीन उत्पादनं किंवा आयफोन, आयवॉच, आयपॅड यांची नवीन अपडेटेड मॉडेल लाँच होत असतात. भारतातही आयफोन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे सध्या सगळ्यांना उत्सुकता आहे ती आयफोन १६ (iPhone 16) ची. आयफोनची मार्केटमध्ये चलती आहे. आता, ॲपलकडून आयफोन १६ सीरीज पुढील महिन्यात लाँच करण्यात येत आहे. ॲपलच्या या १६ सीरीजमधील सर्वच मॉडेलची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. काही दिवसांपूर्वी आयफोन १६ आणि आयफोन १६ प्रो यांचा डमी लीक झाला होता. त्यामुळे, लोकांना या फोनचं डिझाईन आणि नवीन लुक माहीत झाला आहे. आता त्याचे फिचरही हळू हळू लीक होत आहेत. नवीन सीरिज ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा सढळ वापर केलेली असेल, असं समजतंय. (iPhone 16 Price)
(हेही वाचा – UBT Shiv Sena ला उभे होण्यापूर्वीच पाडले, ताकदच संपवली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने!)
अमेरिकेत आयफोन १६ ची (iPhone 16) लाँचिंग किंमत ७९९ अमेरिकन डॉलर इतकी असू शकते. भारतात आयफोन ७९,९०० रुपयांपासून सुरू होईल असा अंदाज आहे. तसेच आयफोन १६ प्लसची ग्लोबल किंमत ८९९ डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, भारतात या फोनची किंमत ८९,९०० रुपये असू शकते. आयफोनच्या प्रो मॉडेल्सचा विचार केल्यास आयफोन १६ प्रो ची लाँचिंग प्राईज १,०९९ डॉलर एवढी असू शकते. तर, भारतात या फोनची किंमत १,३४,९०० रुपये एवढी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सीरीजमधील सर्वात प्रीमीयम मॉडेल म्हणजे आयफोन १६ प्रो मॅक्स असून त्याची किंमत ग्लोबल मार्केटमध्ये १,९९९ डॉलर असू शकते. तर, भारतातील या फोनची किंमत १ लाख ५९ हजार रुपये असण्याची शक्यता आहे. या वर्षी लॉन्च होत असलेल्या अॅपल च्या आयफोन १६ मीलिकेत आयओएस १८ ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसेच, ॲपल इंटलिजन्सचे इंटिग्रेशनही पाहायला मिळेल. (iPhone 16 Price)
(हेही वाचा – T20 Super Over : एकाच टी-२० सामन्यात ३-३ सुपर ओव्हर, देशांतर्गत सामन्यात नवीन विक्रम)
१६ सीरीजमधील आयफोनचा डिस्प्ले आयफोन १५ च्या तुलनेत मोठा असेल. आयफोन १६ (iPhone 16) आणि आयफोन १६ प्लस मध्ये अनुक्रम ६.१ इंच आणि ६.७ इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तर, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स मध्ये अनुक्रम ६.३ इंच आणि ६.९ इंच डिस्प्ले मिळू शकतो. दरम्यान, आयफोन १५ च्या सीरीजप्रमाणेच या १६ सीरीजमध्येही डायनॅमिक आयलँड फीचर्सचा वापर केला जाऊ शकतो. (iPhone 16 Price)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community