-
ऋजुता लुकतुके
तुमच्या ॲपल फोनमध्ये आयओएस १८.२ ही मध्यवर्ती प्रणाली तुम्ही डाऊनलोड केलेली असेल तर तुम्हाला आयफोनवर कॉल आणि मेसेज करण्यासाठी डिफॉल्ट ॲप म्हणून व्हॉट्सॲप वापरता येणार आहे. आयफोनचं मूळ कॉल ॲप अशावेळी बंदच होईल. त्याच्या जागी व्हॉट्सॲपचा वापर सुरू होईल. त्यासाठी नवीन प्रणालीत एपीआय नावाचं तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. त्यामुळे एआयपीमुळे तुम्ही फोन करताना तुम्हाला कुठलं ॲप वापरायचं आहे अशी विचारणा होईल. एकदा डिफॉल्ट ॲप म्हणून व्हॉट्सॲप सेट केलंत तर पुढील सर्व कॉल आणि मेसेज हे या ॲपवरूनच येतील. सध्या ॲपल कंपनीने ही सुविधा हळू हळू ग्राहकांना देऊ केली आहे. अगदी बिटा फोन असलेल्यांनाही ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल. सर्वांपर्यंत ती पोहोचण्यासाठी थोडा वेळ जाऊ शकतो. (iPhone Default Whatsapp Settings)
(हेही वाचा – Ind vs Aus, T-20, ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये रंगणार ८ टी-२०; एकदिवसीय सामने)
तुम्हालाही आयफोनवर व्हॉट्सॲप हेच डिफॉल्ट ॲप वापरायचं असेल तर आधी तुमच्या आयफोनमध्ये १८.२ ही प्रणाली डाऊनलोड करून घ्यावी लागेल. त्यासाठी तुमचा फोन तुम्हाला अपडेट करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सॲपचंही अद्ययावत अपडेट फोनमध्ये असावं लागेल. त्यासाठी ॲप स्टोअरमध्ये जाऊन तुमचं व्हॉट्सॲप अपडेटेड आहे याची खात्री करून घ्या. एकदा या दोन्ही गोष्टी झाल्या की, सेटिंग्समध्ये जाऊन ॲप्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डिफॉल्ट ॲपवर क्लिक करून तुम्हाला कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी व्हॉट्सॲप हा पर्याय निवडायचा आहे. (iPhone Default Whatsapp Settings)
(हेही वाचा – Bangladeshi Infiltrators : तीन वर्षात हजाराहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक)
आयफोन ग्राहकांना फोन वापरताना ॲपचे विविध पर्याय असावेत यासाठी ही सुविधा ॲपल कंपनीने दिली आहे. इथून पुढे वेब ब्राऊझिंग, ईमेल, कॉल फिल्टरिंग, पेमेंट, ट्रान्सलेशन, कॉल फिल्टर, पासवर्ड मॅनेजमेंट अशा विविध सुविधांसाठी तुम्ही ग्राहक म्हणून तुमच्या पसंतीचं ॲप वापरू शकाल. यापूर्वी वेब ब्राऊझिंगसाठी सफारी हे ॲपल निर्मित ॲपच डिफॉल्ट सेटिंगमध्ये असायचं. पण, जगभरात गुगल क्रोम किंवा इतर ॲप लोकप्रिय आहेत. तसंच गुगल मॅप लोकप्रिय असताना ॲपल मॅप डिफॉल्ट असायचा. तसंच पेमेंट्सचं होतं. पण, आता ॲपलने ही भूमिका बदलली असून ग्राहकांना त्यांच्या पसंतीची ॲप आयफोनमध्ये डिफॉल्ट म्हणून वापरता येणार आहेत. (iPhone Default Whatsapp Settings)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community