IPL & Economy : आयपीलमुळे वाढणार बाजारातील उलाढाल?

आयपीएल सुरू झाल्या झाल्या पहिली झुंबड आवडत्या संघाची जर्सी घेण्यासाठी उडाली आहे. 

178
IPL & Economy : आयपीलमुळे वाढणार बाजारातील उलाढाल?

आयपीएल (IPL) ही जगातील आर्थिकदृष्ट्या सगळ्यात मोठी स्पर्धा आहे. आणि यंदाचा हंगाम सुरू झाल्या झाल्या आता देशातील बाजारपेठही विस्तारताना दिसत आहे. काही महिने थांबलेले व्यवहार आता पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. स्पर्धेचं हे सतरावं वर्षं आहे. आणि आतापर्यंत मूल्यांकनाचा निकष वापरला तर ही स्पर्धा अमेरिकेतील नॅशनल लीग आणि इंग्लंडमधील इंग्लिश प्रिमिअर लीगच्या बरोबरीची आहे. (IPL & Economy)

यापूर्वी भारतात एकदिवसीय विश्वचषक झाला तेव्हा असंच वातावरण भारतात तयार झालं होतं. आताही आयपीएलच्या (IPL) आठ आठवड्यांत भारतात हॉटेल, पब, फूड डिलिव्हरी यांची मागणी वाढण्याचाच अंदाज आहे. फक्त आयपीएलच नाही तर देशात सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. त्यामुळे प्रचार सभा आणि रॅलींच्या निमित्ताने देशात तयार अन्नपदार्थांची आणि शीतपेयांची मागणी वाढेल असाच अंदाज व्यक्त होत आहे. (IPL & Economy)

(हेही वाचा – BMC : गगराणी सकाळी ९ वाजल्यापासून तर बांगर आठवड्याचे सातही दिवस करणार काम)

आयपीएलचं एकूण मूल्य २०२४ मध्ये ११ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात

‘पुढचे तीन महिने हे भारतीय बाजारांसाठी मागणीचा जोर वाढलेलेच असणार आहेत. अन्न पदार्थ, स्पोर्ट्स साहित्य, टीव्ही अशा अनेक गोष्टींची विक्री या कालावधीत वाढेल. आयपीएल (IPL) आणि निवडणुका यांचा हा एकत्रित परिणाम असेल. अजून स्पर्धा सुरूही नाही झाली तर मॅकडोनाल्डची भारतीय फ्रँचाईजी चालवणारी कंपनी वेस्टलाईफ फूडवर्ल्डचे शेअर वाढले आहेत. तेच झोमॅटो, स्विगीचं येणाऱ्या दिवसांत होईल. आणि त्यातून बाजाराचा कल दिसून येतो,’ असं बँक ऑफ बरोडाचे मुख्य अर्थतज्ञ मदन सबनवीस यांनी बोलून दाखवलं. (IPL & Economy)

आयपीएलचं एकूण मूल्य २०२४ मध्ये ११ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात गेलं आहे. फक्त प्रायोजकत्वातूनच या लीगने यावर्षी ३० ते ४० अब्ज अमेरिकन डॉलरची कमाई केली आहे. टाटा समुहाने टायटल प्रायोजकत्वासाठी विक्रमी २५ अब्ज रुपयांचा करार केला. तर डिजिटल प्रसारण आणि कॅम्पा ब्रँडच्या प्रायोजकत्वासाठी रिलायन्स समुहानेही २.७ अब्ज रुपये मोजले आहेत. ग्राहकांमध्येही स्पर्धेच्या निमित्ताने उत्साह संचारेल अशी सगळ्यांना आशा आहे. (IPL & Economy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.