IPO Boom : आयपीओमधील गुंतवणुकीतून या स्टारनी मिळवले करोडो रुपये 

IPO Boom : शेअर बाजार वर चढतोय तसं आयपीओचा बाजारही वर आहे

193
IPO Boom : आयपीओमधील गुंतवणुकीतून या स्टारनी मिळवले करोडो रुपये 
IPO Boom : आयपीओमधील गुंतवणुकीतून या स्टारनी मिळवले करोडो रुपये 

ऋजुता लुकतुके

गेल्या २ ते ३ वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजारात आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. त्यापैकी सगळ्यात गाजला तो टाटा टेकनोलॉजीज् कंपनीचा आयपीओ. पण, या व्यतिरिक्तही आयपीओंना गुंतवणूकदारांकडून चांगला उठाव होता. आणि यात पैसा गुंतवणारे काही स्टार गुंतवणूकदारही होते. अशीच काही उदाहरणं आणि त्यांनी आयपीओमधून केलेली कमाई पाहूया. मनीकंट्रोल वेबसाईटने ही माहिती संकलित केली आहे. (IPO Boom)

(हेही वाचा- Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी नीरज चोप्राने केली ‘ही’ मोठी घोषणा )

आमीर खान आणि रणबीर कपूरने केली ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्समधून कमाई 

ड्रोन आचार्य एरियल इनोव्हेशन्स कंपनीच्या आयपीओचे दोन मोठे गुंतवणूकदार होते आमीर खान आणि रणबीर कपूर. दोघांनी प्री-आयपीओ स्तरावरच यात गुंतवणूक केली होती. एसएमई लिस्टिंगच्या वेळी आमीर खानने या कंपनीचे ०.२६ टक्के शेअर २५ लाख रुपयांना विकत घेतले. तर रणबीर कपूरने यात २० लाख रुपये गुंतवून ०.२१ भागिदारी विकत घेतली. कंपनीच्या शेअरची किंमत ठरली प्रत्येकी ५३.५९ रुपये. आणि २३ डिसेंबर २०२२ ला हा शेअर लिस्ट झाला तोच मूळी १०२ रुपयांवर. (IPO Boom)

कंपनीचं आताचं बाजारमूल्य पाहिलं तर आमीरच्या गुंतवणुकीची आताची किंमत आहे ७२.६२ लाख रुपये. तर रणबीरच्या गुंतवणुकीची किंमत आहे ५७.९७ लाख रुपये. (IPO Boom)

(हेही वाचा- Virat Kohli On IPL : विराट कोहलीने सांगितलं, आयपीएलच्या लोकप्रियतेचं रहस्य )

सचिनची आझाद इंजिनिअरिंगमधील गुंतवणूक 

सचिन तेंडुलकर नियमितपणे आयपीओमध्ये गुंतवणूक करतो. आणि इथंही तो क्रिकेटप्रमाणेच जोरदार फलंदाजी करताना दिसतो. अलीकडेच आझाद इंजिनिअरिंग या कंपनीत सचिनने प्री-आयपीओ स्तरावर ४.९९ कोटी रुपये गुंतवले. त्याला एक शेअर पडला ११४ रुपयांना. आणि असे ४,३८,१२० शेअर त्याला मिळाले. (IPO Boom)

हा शेअर लिस्ट झाला तोच ७२० रुपयांच्या भावाने. आणि ७ मार्चपर्यंत हा शेअर १,३७७ वर पोहोचला होता. म्हणजेच या गुंतवणुकीवर सचिनला १२ पट परतावा मिळाला आहे. सचिनने अजूनही कंपनीत गुंतवणूक कायम ठेवली आहे. (IPO Boom)

(हेही वाचा- Udhhav Thackeray : उद्धवजी ! या जन्मात तुम्हाला नितीनजी कळणे कठीण !)

आलिया भट, कतरिना कैफ यांची नायकातील गुंतवणूक 

आलिया आणि कतरिना यांनी नायका कंपनीतील गुंतवणूक गाजली होती. जुलै २०२० मध्ये आलियाने नायका या ब्रँडच्या आयपीओत ४.९५ कोटी रुपये गुंतवले. १० नोव्हेंबर २०२१ ला कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झाली. आणि आलियाला या गुंतवणुकीवर ११ पट जास्त परतावा मिळाला. (IPO Boom)

याच कंपनीत कतरिना कैफने नायका – केके ब्युटी या नावाने एक नवीन उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमात २.२ कोटी रुपये कतरिनाने दिले होते. आता त्यांचीच किंमत २२ कोटींवर पोहोचली आहे. (IPO Boom)

(हेही वाचा- Sachin Praises Amir Lone : ‘हाच खरा लेगस्पिनर आहे,’ असं सचिन कुणाबद्दल म्हणाला?)

अजय देवगणची पॅनोरमा स्टुडिओज मध्ये गुंतवणूक 

अजय देवगणने पॅनोरमा स्टुडिओजमध्ये २.७४ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रिफरेन्शिअल शेअरच्या माध्यमातून केली होती. २७४ रुपये मूल्याचे १ लाख शेअर अजय देवगणला मिळाले. हाच शेअर आता ९९५ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे अजय देवगणच्या गुंतवणुकीचं मूल्यही आता ९.९५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. अजय देवगणला झालेला नफा हा ३३६ टक्क्यांच्या घरात आहे. (IPO Boom)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.