IPS Transfer: राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

314
IPS Transfer: राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
IPS Transfer: राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (10 Transfers of IPS Officers) आदेश सोमवारी गृह विभागाकडून काढण्यात आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांची यांची बदली अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती येथे करण्यात आली असून कारागृह व सुधारसेवा हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. (IPS Transfer)

(हेही वाचा – Worli hit and run case: मिहीरसह संपूर्ण शहा कुटूंब बेपत्ता, राजेश शहा याने पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न)

तसेच, पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची नियोजन व समन्वय महाराष्ट्र राज्य येथे बदली करण्यात आली आहे. विशेष कृती दलाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांची अप्पर पोलीस महासंचालक लोहमार्ग येथे बदली करण्यात आली आहे. तर महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक दीपक पांडे यांची पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. (IPS Transfer)

(हेही वाचा – तीन महिने उलटूनही भाजपा प्रवेश न झाल्याने Eknath Khadse द्विधा मनस्थितीत?)

सुरेश मेखला यांची वाहतुक महाराष्ट्र राज्य येथे बदली करण्यात आली आहे. तसेच विशेष पोलीस महासंचालक सुहास वारके यांची महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे.
अस्विनी डोरजे, छेरिंग डोरजे , रंजन कुमार शर्मा, डी.के.पाटील भुजबळ यांची विशेष पोलीस महासंचालक म्हणून रिक्त जागेवर बदली करण्यात आली आहे. (IPS Transfer)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.