इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांच्या नावावर असलेला वरळीतल्या सिजे हाऊसमधले दोन मजले ईडीने ताब्यात घेतले. वरळीतल्या सिजे हाऊस या इमारतीत गँगस्टर इक्बाल मिर्ची याची पत्नी आणि मुलांनी तिसरा आणि चौथा मजला खरेदी केला होता. ज्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. सिजे हाऊस इमारतीचे बांधकाम राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्याशी संबंधित असणाऱ्या एका कंपनीमार्फत करण्यात आले असून या प्रकरणात ईडीकडून त्यांचीही एकदा चौकशी झालेली आहे.
इक्बालची पत्नी, २ मुले फरार!
इक्बाल मिर्ची याची पत्नी हाजरा मेनन आणि तिची दोन मुले असिफ आणि जुनैद यांनी सिजे हाऊसमध्ये 14500 स्क्वेअर फुटांचे दोन मजले खरेदी केले होते आणि एका खाजगी कंपनीला भाडेतत्वावर दिले होता. ईडीने त्या कंपनीला विनंती करून ती जागा ताबडतोब खाली करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता त्याचा ताबा ईडीने घेतला. मिर्चीच्या बऱ्याच संपत्तीवर ईडीकडून टाच आणली जात आहे. भारतात आणि परदेशातल्या त्याच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई सुरूच आहे. इक्बाल मिर्ची याची पत्नी आणि दोन्ही मुलांना डिसेंबर महिन्यात ईडीने केलेल्या विनंतीनुसार कोर्टाने फरार घोषित केले होते.
(हेही वाचा : सामांन्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय का? पटोलेंचा फडणवीसांना सवाल!)
दाऊदच्या मालमतेपासून सुरु झाली कारवाई!
संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या देशभरातील मालमत्तेवर टाच आणण्यास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणण्यास सुरुवात केली आहे. ईडीने सर्वात पहिली कारवाई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा इकबाल मिर्ची याच्या मालमत्तेपासून सुरुवात केली आहे. मुंबईतील वरळी भागात सी व्ह्यू, मरियम लॉज आणि राबिया मॅन्शन हे १५३७ चौरस मीटरची जागा खरेदी करताना या जागेचा गैरव्यवहार झाला होता, एका ट्रस्टच्या नावावर असलेली हि मालमत्ता इक्बाल मिर्चीच्या नावावर करून देण्यासाठी तसेच मालमत्ता खरेदी करताना हवाला मार्फत व्यवहार झाला.
Join Our WhatsApp Community