इराणच्या (Iran) ताब्यात असलेल्या मालवाहू जहाज एमएससी एरिजवर काम करणारी महिला एन. टेसा जोसेफ भारतात परतली आहे. ती मूळची केरळची आहे.13 एप्रिल रोजी हे जहाज इराणच्या (Iran) नौदलानं ताब्यात घेतलं होतं. हे जहाज भारतात येत होतं. यावर जहाज चालक दलातील 25 लोकआहेत. त्यात 17 भारतीयआहेत. या लोकांची तात्काळ सुटका व्हावी अशी मागणी त्या लोकांच्या नातलगांनी केली होती. (Iran)
इराणचे परराष्ट्रमंत्री आमिर अब्दोल्लाहाइ यांच्याशी चर्चा
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला तेहरान दुतावास उर्वरित 16 जणांच्या सुटकेसाठी चर्चा करत आहे अशी माहिती दिली. हे सर्व लोक सुखरुप असून त्यांना आपल्या नातलगांशी बोलू दिलं जात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री आमिर अब्दोल्लाहाइ यांच्याशी चर्चा केली आहे असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. (Iran)
हे पहा –
Join Our WhatsApp Community