इराणमध्ये बुरखाविरोधी आंदोलन पेटले, आणखी एका महिलेचा मृत्यू, भारतीय मुस्लिम महिलांवर दबाव

186

जगभरातील काही मुस्लिम राष्ट्रांमधील महिला आता बुरख्याच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी जोरदार आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा केंद्रस्थान इराण बनले आहे. या देशात मुस्लिम महिला आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. पोलीस बळाचा वापर करत असूनही महिला त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. पोलिसांच्या मारहाणीत १६ सप्टेंबर रोजी महसा आमीनी हिचा मृत्यू झाला होता, तर रविवार, ९ ऑक्टोबर रोजी १६ वर्षीय शरीना नावाच्या मुलीने बुरखा घालण्यास विरोध केला, म्हणून तिलाही पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे तिचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराणमध्ये हे आंदोलन आणखी पेटले आहे.

काय पार्श्वभूमी आहे या आंदोलनाची?

इराणच्या कुर्दिस्तान प्रांताच्या साकीज नावाच्या शहाराची राहणारी महसा अमीनी (२२) हिचा १६ सप्टेंबर रोजी रूग्णालयात मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीच्या कथनानुसार तेहरानमध्ये आमीनीला पोलिसांनी हिजाब परिधान न केल्यामुळे अटक केली होती, तेव्हा तिचा भाऊ आराश तिच्यासोबत होता. त्याने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले की, आमीनीला पोलिसांनी त्याच्या समक्ष मारहाण करत फरपटत नेले होते. अमीनीचे वडील अमजद अमीनी यांनीही पोलिसांवर आरोप लावला आहे की, त्यांची मुलगी महसा हिचा पोलिसांच्या मारहाणीमध्येच मृत्यू झालेला आहे. तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे. तिला हृदय विकाराचा त्रास नव्हता. या घटनेनंतर सरकार विरूद्ध लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. विरोध म्हणून अनेक महिलांनी आपले केस कापून टाकलेले आहेत. महिलांच्या स्वातंत्र्यासंबंधी जगभरातून इराणला प्रश्‍न विचारले जात आहेत.

भारताविषयी विचारले जातायेत प्रश्न 

समाज माध्यमातून महसा अमीनी आणि इराणी महिलांच्या स्वातंत्र्याच्या हक्काचे जोरदार समर्थन सुरू आहे. एवढेच नव्हे तर या घटनेच्या निमित्ताने भारतीय मुस्लिम महिलांच्या हिजाब घालण्याच्या प्रवृत्तीवरही टिकेची झोड उठविण्यात आलेली आहे. भारतात तर मुस्लिम महिला हिजाब घालण्यासाठी आग्रही आहेत, त्या मुस्लिम महिला आता लक्ष्य बनू लागल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.