इस्रायलने दमास्कस आणि अलेप्पो विमानतळांवर बॉम्ब टाकले आहेत. (Israel-Palestine Conflict) इराणचे परराष्ट्रमंत्री सीरियात येणार होते. त्याआधी इस्रायलने जोरदार बॉम्बफेक केली. त्यामुळे इराणचे परराष्ट्रमंत्री होसेन अमीराब्दुल्लाहियान यांना सीरियात न जाताच परतावे लागले. सीरियाला इराणकडून होणाऱ्या पुरवठा लाइनमध्ये व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने इस्रायलने हल्ले चढवले आहेत, असे सांगितले जात आहेत.
(हेही वाचा – C. D. Barfiwala Road, Juhu-Versova Road : सी. डी. बर्फीवाला रोड ते जुहू-वर्सोवा रोडवर मेट्रोच्या खालून नवीन पुलाची चाचपणी)
इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर आता त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. गाझा पट्टीवर इस्रायलचे हवाई हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, लेबनॉननंतर इस्रायलनेही सीरियावरही बॉम्बहल्ला केला आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, इस्रायलने दमास्कस आणि अलेप्पो विमानतळांवर बॉम्ब टाकले असून त्यामुळे तेथे खळबळ माजली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्रीही सीरियात येणार होते. त्याआधी इस्रायलने जोरदार बॉम्बफेक केली, त्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री परतले. (Israel-Palestine Conflict)
गाझामध्ये दुकानांबाहेर लांबच लांब रांगा
दुसरीकडे, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर गाझामध्ये किराणा दुकानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इस्रायलनेही या भागावर नव्याने हवाई हल्ला केला आणि ते जमिनीवरील कारवाईची तयारी करत असल्याचे सांगितले. इस्रायलने गाझाला अन्न, पाणी, इंधन आणि वीजपुरवठा बंद केल्यानंतर या भागातील मृतांची संख्या वाढू शकते, असा इशारा आंतरराष्ट्रीय मदत गटांनी दिला आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
गाझा हा केवळ 40 किलोमीटरचा प्रदेश आहे. ज्यामध्ये सुमारे 2 कोटी 30 लाख लोक राहतात आणि जमिनीवरील हल्ल्यामुळे दोन्ही बाजूंच्या मृतांची संख्या वाढू शकते. हमासने शनिवारी इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्रे डागली, ज्यानंतर जग भयभीत झाले आहे. एका अंदाजानुसार, हमासने 150 इस्रायली लोकांना ओलीस ठेवले आहे. (Israel-Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community