भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतात विस्तारलेले आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रेल्वेने प्रवास केला आहे. लांबच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवास हा सोयीस्कर ठरतो. रेल्वे प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही उधारीवर रेल्वे प्रवास करू शकता. बऱ्याचदा अचानक गावी जावे लागते किंवा तुम्ही कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे रेल्वे तिकिटासाठी पैसे नसतील, तुमचा पगार झालेला नसेल तर आता तुम्हाला चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आता तुम्ही मोफत रेल्वे तिकीट बुक करू शकता. रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी Travel Now Pay Later ची सुविधा तात्काळ तिकिटांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याद्वारे तुम्ही आधी तिकीट बुक करून नंतर तुमच्याकडे पैसे आल्यावर रेल्वेला पैसे देऊ शकता. या सुविधेअंतर्गत तुम्ही तिकीट बुक करण्यासोबत खरेदीही करू शकता.
( हेही वाचा : BMC Elections: वाॅर्ड रचनेसंदर्भात तूर्तास हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; आता दिवाळीनंतर सुनावणी होण्याची शक्यता )
सहा महिन्यांनी भरा पैसे
Travel Now Pay Later या खास सुविधेचा वापर करून तुम्ही तिकीट बुक करू शकता. तुम्ही CASHe पर्याया वापरून EMI चा पर्याय निवडून तिकीट बुक करू शकता. CASHe च्या माध्यमातून तुम्ही साधारण आणि तात्काळ अशी दोन्ही तिकिटे बुक करू शकता. तिकीटासाठी रक्कम ही तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत प्रवासी हप्त्याने भरू शकतात. या सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही.
IRCTC च्या रेल कनेक्ट या App च्या माध्यमातून तुम्हाला Travel Now Pay Later या सुविधेचा लाभ घेता येईल. ही सुविधा संपूर्ण देशात लागू आहे. IRCTC चे रेल कनेक्ट हे App तुम्ही प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.
Join Our WhatsApp Community