IRCTC Booking : आता चॅटबॉटद्वारे करता येणार रेल्वे तिकिटांचे बुकिंग

रेल्वे ही भारतीयांची लाईफलाईन असल्यामुळे बहुतांश लोक रेल्वेने प्रवास करतात म्हणूनच लागोपाठ सुट्ट्या आल्यावर रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळत नाही. प्रवासी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) वेबसाइटवर जाऊन अगदी सहज तिकीट बुक करू शकतात. परंतु आता तिकीट बुक करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ झाली आहे. IRCTC ने आता अशी सेवा सुरू केली आहे, जी व्यक्तीला अधिकृत चॅटबॉटद्वारे तिकिटांचे बुकिंग करण्यास परवानगी देते.

( हेही वाचा : कोकण रेल्वेमार्गावरील १८ एक्स्प्रेस गाड्या मंगळवारपासून धावणार विद्युत वेगाने!)

अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही

भारतीय रेल्वेने ऑक्टोबर २०१८ मध्ये आस्क दिशा नावाचा AI-powered चॅटबॉट सुरू केला होता. दिशा म्हणजे ‘डिजिटल इंटरेक्शन टू सीक हेल्प एनीटाइम’ आहे. याअंतर्गत तिकीट बुकिंगपासून ग्राहकांच्या अनेक समस्यांचे निराकरण सुद्धा करण्यात येते.

दररोज जवळपास १० लाखांहून अधिक लोक आयआरसीटी वेबसाइटला भेट देतात. चॅटबॉटद्वारे रिझर्व्हेशन केल्यामुळे प्रवाशांना आयआरसीटीच्या वेबसाईट किंवा अ‍ॅप्लिकेशनवर जावे लागणार नाही. या सेवेसाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क सुद्धा भरावे लागणार नाही.

जेवणही ऑर्डर करता येणार 

जर एखादा प्रवासी UPI द्वारे पैसे भरत असेल तर आयआरसीटीसी स्लीपर क्लाससाठी १० रुपये अधिक आणि एसी बर्थसाठी १५ रुपये अधिक आकारले जातील. जर पेमेंट कोणत्याही इतर ऑप्शनद्वारे केले असेल तर रेल्वे स्लीपर क्लाससाठी २० रुपये आणि एसी क्लाससाठी अतिरिक्त ३० रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच आयआरसीटीच्या नव्या सुविधेनुसार प्रवासी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सुद्धा सहज आपल्या बर्थ क्रमांक टाकून जेवण ऑर्डर करू शकतात.

चॅटबॉट म्हणजे काय ? 

चॅटबॉट मधील चॅट म्हणजे संभाषण आणि बॉट म्हणजे रोबोट अशाप्रकारे चॅटबॉट म्हणजे बोलणारा रोबोट, मात्र हा रोबोट प्रत्यक्षात अस्तित्वात नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here