रेल्वे प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री! या खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या नवे दर

भारतात रेल्वे प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. या प्रवाशांना सुद्धा आता महागाईचा फटका बसणार आहे. रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली असून यामध्ये रोटी, डाळ, डोसा, सॅंडविच अशा पदार्थांचा समावेश आहे. पूर्व मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतून जाणाऱ्या सर्व गाड्यांमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. IRCTC चे प्रादेशिक महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

( हेही वाचा : महारेरा ३१३ प्रकल्पांना देणार कारणे दाखवा नोटीस; प्रत्यक्ष होणार तपासणी )

रेल्वेमधील पदार्थ महागले…

IRCTC ने खाद्यपदार्थांचे नवे दर जारी केले आहेत. परंतु या किमती अधिक वाढवल्या नसून काही प्रमाणात स्थिर ठेवल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. IRCTC ने पूर्व मध्य रेल्वेवरून जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रत्येक डिशच्या किमती २ ते २५ रुपयांनी वाढवल्या आहेत. IRCTC ने अशा ७० खाद्यपदार्थांची यादी जारी केली आहे. आता ट्रेनमध्ये समोसा खाण्यासाठी ८ रुपयांऐवजी प्रवाशांना १० रुपये मोजावे लागणार आहेत. तर सॅंडविचची किंमत १६ रुपये असेल. याशिवाय रोटी सुद्धा १० रुपयांना मिळणार आहे.

पदार्थ – जुन्या किंमती – नव्या किंमती

  • समोसा – ८ रुपये – १० रुपये
  • सॅंडविच – १५ रुपये – २५ रुपये
  • बर्गर – ४० रुपये – ५० रुपये
  • ढोकळा ( १०० ग्रॅम) – २० रुपये – ३० रुपये
  • ब्रेड पकोडा – १० रुपये – १५ रुपये
  • आलू वडा – ७ रुपये – १० रुपये
  • मसाला डोसा – ४० रुपये – ५० रुपये
  • रोटी – ३ रुपये – १० रुपये

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here