- ऋजुता लुकतुके
भारतात देशभर रेल्वेचं जाळं पसरलं आहे आणि दररोज लाखो लोक या सेवेचा लाभ घेतात. रेल्वेचा अपघात घडल्यास रेल्वेनं प्रवाशांसाठी अपघात विम्याचीही सोय केली आहे. आयआरसीटीसी (IRCTC) वेबसाईट किंवा ॲपवर ऑनलाईन तिकीट खरेदी करणाऱ्यांना या विम्याचा लाभ घेता येतो. अर्थात, हा विमा ऐच्छिक आहे. तो घ्यायचा असल्यात प्रत्येक व्यक्तीमागे अतिरिक्त ४५ पैसे तुम्हाला भरावे लागतात आणि त्यानंतर त्या प्रवासासाठी तुम्हाला तो विमा लागू होतो. आयआरसीटीसी कंपनीने तीन विमा कंपन्यांशी त्यासाठी करार केला आहे. पण, तुम्हाला कोणत्या कंपनीचा विमा मिळणार हे तुम्ही ठरवू शकत नाही. केवळ ४५ पैशांमध्ये तुम्हाला मृत्यूपश्चात कुटुंबीयांना १० लाख रुपये मिळू शकतात. तर कायमचं अपंगत्व आल्यास तुम्हाला ७,५०,००० रुपये मिळतात. अपघातामुळे रुग्णालय वारी करावी लागल्या, ५ लाख रुपयांपर्यंतचा तो खर्चही विम्यातून मिळतो. (IRCTC Travel Insurance)
भारतीय रेल्वेनं सप्टेंबर २०१६ मध्ये प्रवाशांसाठी ऐच्छिक प्रवास विम्याची सुरुवात केली. त्यावेळी सुरुवातीला विम्याचा हफ्ता ९२ पैसे इतका होता. आता तो ४५ पैशांवर आला आहे. आयआरसीटीसीच्या (IRCTC) माध्यमातून रेल्वे तिकीट घेतलं असेल तरंच ही सुविधा मिळते. तुम्ही तिकीट खरेदी करताना विम्याचा पर्याय स्वीकारल्यास, तुमच्याकडून तिकीटासह हफ्त्याची रक्कम घेतली जाते आणि लगेचच तुमच्या ई-मेलवर एक लिंक येते. त्या लिंकमध्ये तुम्हाला नामांकन आणि इतर माहिती द्यायची असते. म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्या पश्चात विम्याची रक्कम मिळू शकते. (IRCTC Travel Insurance)
(हेही वाचा – ICC ODI Team of the Year : आयसीसीच्या एकदिवसीय संघात एकही भारतीय नाही)
रेल्वेतील सर्व श्रेणींमध्ये म्हणजेच फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, स्लीपर किंवा चेअर कार तसंच कन्फर्म आणि आएसी तिकिटांवर हा विमा मिळतो. नव्या बदलानुसार लहान मुलांच्या अर्ध्या तिकीटावर हा विमा लागू नाही. एखादी रेल्वे रुळावरुन घसरली आणि त्यामध्ये प्रवासी जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर या विम्याचा दावा करता येतो. दोन रेल्वेची धडक झाल्यानंतर प्रवाशाचं शारीरिक किंवा मानसिक नुकसान झालं असेल तरी क्लेम करता येईल. रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये प्रवाशांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तरी तुम्ही क्लेम करु शकता. (IRCTC Travel Insurance)
रेल्वे प्रवासात एखाद्या प्रवाशानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अथवा, त्याची मानसिक स्थिती नीट नसल्यानं तो कोणत्याही कारणामुळे रेल्वेतून पडला किंवा त्याचा मृत्यू झाला तर रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जात नाही. या प्रकारच्या घटनांमध्ये इन्शुरन्सचा क्लेम करता येत नाही. रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार किमान १० लाखांपर्यंत क्लेम मिळू शकतो. रेल्वे अपघातानंतर ४ महिन्यांपर्यंत क्लेम करता येतो. आयआरसीटीसीने (IRCTC) दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना दिली जाते. (IRCTC Travel Insurance)
(हेही वाचा – ICC Test Team of the Year : आयसीसीच्या २०२४ च्या सर्वोत्तम खेळाडूंच्या कसोटी संघात तिघे भारतीय)
- एखाद्या प्रवाशाचा रेल्वे प्रवासात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत मिळू शकते.
- एखादा प्रवासी पूर्ण अपंग झाला तर त्यालाही १० लाख रुपयांचा इन्शुरन्स क्लेम मिळतो.
- काही काळापुरते स्थायी अपंगत्व आले तर साडेसात लाख रुपयांची मदत मिळते.
- रेल्वे अपघातामध्ये एखादा प्रवासी गंभीर जखमी झाला असेल तर त्याचे कुटुंबीय २ लाखांपर्यंतचा क्लेम करु शकतात.
- एखाद्या प्रवाशाचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्याचा मृतदेह घरी आणण्यासाठी ट्रान्सपोर्टची आवश्यकता असेल तर १०,००० रुपयांपर्यंतची मदत मिळते.
(हेही वाचा – Republic Day Awards 2025: प्रजासत्ताक दिनी ‘शौर्य पुरस्कार’ जाहीर, 942 सैनिकांना सन्मानित करण्यात येणार)
रेल्वेकडून विम्याची रक्कम तुम्हाला लागू होतेच. पण, त्याचबरोबर तुमच्याकडे इतर कुठल्या कंपनीचा घेतलेला विमा असेल तर दोन्ही लाभ एकाच वेळी तुम्हाला घेता येतात का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यावर हिंदुस्थान पोस्टने काही तज्ज्ञांचा सल्ला घेतला. (IRCTC Travel Insurance)
विमा क्षेत्रातील तज्ज्ञ मिलिंद बने म्हणतात, ‘मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटनेत तुम्ही जितक्या विमा पॉलिसीचे हफ्ते भरत असाल त्या सगळ्या पॉलिसी तुम्हाला लागू होतात. टर्म विम्याचं ते कामच आहे. तुम्ही हफ्ते चुकवले नसतील तर तुम्हाला रक्कम मिळणारच. पण, रुग्णालयातील खर्चाच्या बाबतीत तुम्हाला काही शक्यतांमध्ये एकत्रित लाभ मिळू शकतो, किंवा काही शक्यतांमध्ये एकाच पॉलिसीचा लाभ घेता येतो. पण, अशावेळी रेल्वेनं दिलेला विमा पुरणार नसेल तर तुम्ही तुमच्याकडे असलेली इतर पॉलिसी वापरू शकता. शक्यतो खास त्या कारणासाठीच घेतलेली पॉलिसी असेल तर ती आधी वापरावी. मग दुसरी पॉलिसी वापरावी. रेल्वेचा हा खास अपघात विमा असल्यामुळे तो सगळ्यात आधी वापरणं योग्य,’ असं मत मिलिंद बने यांनी व्यक्त केलं. रेल्वेचा विमा ज्या कंपनीकडून घेतलेला असेल त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन विम्याची माहिती आधी करून घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. (IRCTC Travel Insurance)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community