फक्त ६ हजारात उदयपूर फिरण्याची संधी! IRCTC चे स्वस्त मस्त टूर पॅकेज

भारतातील सुंदर ठिकाणांना भेट देण्याची आपल्या सर्वांनाच इच्छा असते. परंतु अनेकदा पैशांमुळे आपले बजेट कोलमडते यासाठीच IRCTC ने प्रवाशांसाठी विविध सुविधा सुरू केल्या आहेत. या टूर पॅकेज अंतर्गत प्रवाशांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे. तुम्ही फक्त ६ हजार रुपयांमध्ये उदयपूरला भेट देऊ शकणार आहात. या टूर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

( हेही वाचा : IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना)

राजस्थानमधील उदयपूर शहराला भेट देण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हे शहर राजस्थानमधील सुंदर शहरांपैकी एक आहे. राहण्यापासून प्रवासापर्यंत सर्व काही तुम्ही फक्त 6 हजारात करू शकता.

संपूर्ण पॅकेजबाबत विस्तृत माहिती…

या टूर पॅकेजचे नाव उदयपूर सिटी ऑफ लेक्स टूर पॅकेज एक्स दिल्ली असे आहे. अर्थात तुमचा प्रवास दिल्लीपासून सुरू होणार आहे. ही ट्रेन दर गुरुवारी दिल्लीतील एस रोहिल्ला येथून संध्याकाळी ७.३५ वाजता सुटेल.

हे संपूर्ण पॅकेज ३ रात्री ४ दिवसांचे असून पहिल्या दिवशी दिल्लीतून तुमचा प्रवास सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ७.५० ला उदयपूरला पोहोचाल. हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर तुम्हाला सहेलियो की बारी, सुखडिया सर्कल, सिटी पॅलेस म्युझियम, कलामंडळ येथे नेण्यात येईल.

ट्रेनचा प्रवास थर्ड एसीमधून करता येईल आणि या पॅकेजअंतर्गत फक्त सकाळच्या नाश्ताची सुविधा दिली जाईल. पॅकेजची सुरूवात ५ हजार ४२५ रुपयांपासून होते. तसेच या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रॅव्हल इंशुरन्स सुद्धा मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here