धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने श्री रामायण यात्रा आयोजित करण्याची योजना आखली आहे. प्रभू रामाच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी भारतीय रेल्वेकडून ‘रामायण सर्किट ट्रेन’ चालवली जाणार आहे. दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे सुटेल. संपूर्ण १७ दिवसांच्या प्रवासात अयोध्या, सीतामढी आणि चित्रकूटसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली जाईल.
भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट
रामायण सर्किट ट्रेनमधून भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट दिली जाणार आहे. या ट्रेनने ७ हजार ५०० किमीचा प्रवास १७ दिवसांत पूर्ण केला जाईल. यात्रेचा पहिला मुक्काम अयोध्या असेल, जिथे श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री हनुमान मंदिराला भेट दिली जाईल. अयोध्येहून ही ट्रेन सीतामढीला जाईल, नंदीग्राम, प्रयागराज, शृंगवेरपुर, आणि चित्रकूट या महत्त्वपूर्ण ठिकाणांचा यात समावेश असेल.
आरक्षण झाले ‘फुल्ल’
आज ७ नोव्हेंबर रोजी पहिली रामायण सर्किट ट्रेन सफदरजंग स्थानकावरून रवाना झाली. या ट्रेनचे वेळापत्रक आधीच तयार झाले होते. या गाडीचे बुकिंग यापूर्वीच पूर्ण झाले असून अशा प्रकारच्या ट्रेनची मागणी भाविकांकडून सातत्याने होत होती. याशिवाय भारतीय रेल्वेने आणखी चार रामायण सर्किट ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. आता दुसरी ट्रेन १६ नोव्हेंबर, तिसरी ट्रेन २५ नोव्हेंबर, चौथी ट्रेन २७ नोव्हेंबर आणि पाचवी ट्रेन २० जानेवारीपासून धावणार आहे. या ट्रेनचे 2AC श्रेणी चे भाडे ८२ हजार ९५० रुपये तर, 1AC श्रेणी चे भाडे १ लाख २ हजार ९५ रुपये एवढे असेल. या ट्रेनमध्ये चविष्ट शाकाहारी भोजन मिळेल.
Join Our WhatsApp Community