भारतीय रेल्वेची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा IRCTC आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठप्प झाली. ख्रिस्ती नवं वर्षाच्या सुरुवातीलाच (IRCTC web Site) कोलमडली होती. १ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता IRCTC ची सेवा कोलमडली होती. संबंधित रेल्वेने (Railway) प्रवास करण्यापूर्वीच प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कालांतराने आयआरसीटीसीची वेबसाईट पूर्वरत झाली आहे. त्यामुळे युजर्सनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. युजर्सनी IRCTC ला टॅग करत सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केल्या आहेत. (IRCTC)
डिसेंबर महिन्यात IRCTC वेबसाईट (IRCTC website down) तीनवेळा ठप्प झाली होती. ज्यामुळे युजर्स प्रचंड वैतागले होते. तात्काळ तिकीट बुकींगच्या (IRCTC Booking) वेळी वेबसाईट डाऊन झाल्याने युजर्सला तिकीट बुक करण्यात अडचणी येत होत्या. यानंतर आज पुन्हा IRCTC ची वेबसाईट डाऊन झाली होती. तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी IRCTC सेवा डाऊन का होत आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे ? IRCTC वेबसाइट आणि ॲप डाऊन झाल्यामुळे लाखो यूजर्सना समस्यांना सामोरे जावे लागले.
(हेही वाचा – Garbage : नव वर्ष स्वागताच्या जल्लोषात नागरिकांनी केला ११ मेट्रिक टन कचरा)
काय संदेश लिहिला होता?
‘तुम्हाला कोणतेही तिकीट रद्द करायचे असल्यास किंवा TDR फाइल करायचा असल्यास, कृपया 14646,0755-6610661 आणि 0755-4090600 किंवा [email protected] वर मेल करा, IRCTC वेबसाइट आणि ॲप ओपन केल्यानंतर हा संदेश स्क्रीनवर येत होता.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community