वैद्यकीय क्षेत्रात विमा (Insurance) आता अतिमहत्वाचा घटक बनला आहे. कालपर्यंत अल्युपॅथीच्या उपचारांसाठी विमा सुविधा उपलब्ध होती, आता यात आयुर्वेद, योग आणि होमिपॅथी याही शाखांच्या वैद्यकीय उपचारांसाठी विमा योजना लागू होणार आहे. विमा नियामक IRDAI यांनी हा निर्णय घेतला आहे.
IRDAI ने सर्व विमा कंपन्यांना आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) सारख्या उपचारांचा वैद्यकीय विमा (Insurance) पॉलिसीमध्ये समावेश करण्यास सांगितले आहे. यामुळे विमा पॉलिसीची लोकप्रियता वाढेल आणि अधिकाधिक लोकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
IRDA ने म्हटले आहे की, सामान्य विमा कंपन्यांनी त्यांच्या पॉलिसींमध्ये (Insurance) आयुष उपचाराचाही समावेश करावा. यासाठी कंपन्या त्यांच्या बोर्डाची मंजुरी घेतल्यानंतर योग्य मार्गदर्शक तत्त्वे सादर करतील. तसेच सर्व सामान्य विमा कंपन्यांना 1 एप्रिल 2024 पर्यंत मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागतील आणि ती नवीन आर्थिक वर्षापासून लागू होईल, असेही IRDAकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community