Irshalwadi landslide : इर्शाळवाडीत शोध मोहीम थांबवणार – मंत्री उदय सामंत यांची घोषणा 

174

इर्शाळवाडी येथील सुरू असलेली शोध मोहीम आता सोमवार, २४ जुलै रोजी थांबवण्यात येत असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. या दुर्टनेत बेपत्ता झालेल्यांना मृत घोषित करणार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत २७ मृतदेह सापडले असून उर्वरित न सापडलेल्या लोकांना मृत घोषित करण्यात येईल असे ते म्हणाले. तसेच बचावलेल्या १४४ लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल असे त्यांनी सांगितलं.

सततच्या पावसामुळे शोधकार्यात प्रचंड अडचणी येत असून यंत्रसामुग्रीची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल, दगड आणि मोठमोठी झाडे सर्वत्र पसरल्याने मदत कार्य कठीण बनले आहे. राष्ट्रीय आपत्ती कृतिदलाचे जवान, ‘एल अँड टी’चे कामगार, अपघातग्रस्त मदत पथक, स्थानिक तरुण, इर्शाळवाडीतील ग्रामस्थ आणि कोल्हापूर व्हाइट आर्मीचे जवान मृतदेह व गाडल्या गेलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी तिसऱ्या दिवशीही राबत होते. दुर्घटना होऊन तीन दिवस झाल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली आहे.

(हेही वाचा Asaduddin Owaisi : ना राहुल गांधी, ना ममता बॅनर्जी, ना अखिलेश यादव मुसलमानांचे सहानुभूतीदार; काय म्हणाले ओवैसी?

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शनिवारच्या शोधकार्यात पिंकी संदेश पारधी (वय २५), नांगी किसन पिरकड (वय ५०), कृष्णा किसन पिरकड (वय २७), भारती मधू भुतांबरा (वय २२) आणि हिरा मधू भुतांबरा (वय १६) यांचे मृतदेह हाती लागले आहेत.
जनावरे गमावल्याचे दुःख

इर्शाळवाडीवर कोसळलेल्या संकटात अनेक ग्रामस्थांनी आपली जिवाभावाची जनावरेही गमावली आहेत. मातीच्या खाली आतापर्यंत चार बैल आणि तीन शेळ्या मृतावस्थेत आढळल्या आहेत. त्याच ठिकाणी खड्डा करून त्यांचे दफन करण्यात आले. कुटुंबीयांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरायचा प्रयत्न करत असलले ग्रामस्थ आपल्या अक्षरशः या सगळ्या घटनेने कोलमडून गेले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.