महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होतोय का? काय सांगते आकडेवारी?    

कोरोनाने बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

144

महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आला नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. कोरोनाने बळी पडलेल्या १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे २०२१ मध्ये सुमारे ०.०७ टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यस्तरीय बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन!

राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालय स्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

(हेही वाचा : केंद्रीय शिक्षण मंडळाची १२वीची परीक्षाही रद्द! )

एकूण कोरोनाबाधितांमध्ये कोरोना संसर्गित मुलांचे प्रमाण – 

नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ –  ० ते ५ वर्षे – १.३ टक्के, ६ ते ११ वर्षे – २.४ टक्के, १२ ते १७ – ४.१ टक्के, एकूण ७.८ टक्के.

महिना                 ० – ५ वर्षे          ६ – ११            १२ – १७          एकूण

  • नोव्हेंबर २०२०         १.३ टक्के          २.१ टक्के         ३.५ टक्के         ६.९ टक्के
  • डिसेंबर २०२०          १.१ टक्के          १.९ टक्के         ३.३ टक्के         ६.३ टक्के
  • जानेवारी २०२१         १.१ टक्के          १.७ टक्के         ३.२ टक्के         ६.० टक्के
  • फेब्रुवारी २०२१         १.१८ टक्के        २.०० टक्के        ४.०८ टक्के        ७.२६ टक्के
  • मार्च २०२१             १.१० टक्के         २.०४ टक्के        ३.६४ टक्के       ६.७८ टक्के
  • एप्रिल २०२१            १.४२ टक्के        २.६२ टक्के        ४.३४ टक्के        ८.३८ टक्के
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.