तुमचे आधार कार्ड खरे की बनावट? गैरवापर टाळण्यासाठी अशी करा पडताळणी

आधार कार्डचा दुरूपयोग रोखण्यासाठी भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी असे आवाहन भारतीय युनिक आयडेंटिफेकेशन अथॉरिटीने राज्य सरकार आणि संस्थांना निवेदनाद्वारे गुरूवारी केले आहे.

( हेही वाचा : MSRTC Recruitment : १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांना एसटी महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी! असा करा ऑनलाईन अर्ज)

आधार धारकाच्या परवानगीनंतर आधार पत्र, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड आणि एम-आधार यांची सत्यता तपासण्यासाठी आधार क्रमांकाची पडताळणी करणे अनिवार्य आहे, असेही यूआयडीएआयने म्हटले आहे.

आधार कार्डाचे विविध प्रकार

  • आधार पत्र
  • ई आधार
  • आधार पीव्हीसी
  • एम-आधार

आधार कार्ड पडताळणी कशासाठी?

  • बनावट आधार कार्ड ओळखता यावे यासाठी पडताळणी आवश्यक आहे.
  • फसवणूक टाळता येणे शक्य
  • आधारमधील माहितीत काही बदल केला असल्यात तो ओळखता येईल.
  • यामुळे संभाव्य गैरवापरावर आळा बसतो. आधार दस्तावेजांची छेडछाड झाली असल्यास ऑफलाइन पडताळणीद्वारे त्याचा शोध घेता येऊ शकतो. आधार कार्डचा गैरवापर करणे हा दंडनीय गुन्हा असून आरोपी कायद्याच्या कलम ३५ अंतर्गत दंडास पात्र आहे.

आधार पडताळणी कशी केली जाते?

  • एम आधार (mAadhaar App) अ‍ॅप किंवा क्यूआर कोड (Aadhaar QR ) स्कॅनच्या साहाय्याने आधार कार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करून पडताळणी करता येते.
  •  QR कोड स्कॅनर Android आणि iOS आधारित मोबाइल फोन तसेच विंडो-आधारित ऍप्लिकेशनसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here