राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पडघा गावातील इसिस मॉड्यूल उघड केले आहे. त्याच्या तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. (ISIS Module Maharashtra)
आरोपपत्रातील धक्कादायक खुलासे
आतंकवादी शर्जिल शेख (Terrorist Sharjeel Sheikh) याने त्याचे कोटक महिंद्रा बँक खाते वापरून सीरियातील ‘द मर्सिफुल हँड्स’ (The Merciful Hands) या संस्थेला पैसे पाठवले होते. झुल्फिकार अली बडोदावाला (Zulfikar Ali Barodawala) याच्या दृष्टीने पडघा (Padgha) गाव हे भारतातील ‘अल् शाम’ (ग्रेटर सीरिया) होते, अशा अनेक धक्कादायक गोष्टी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रातून उघड झाल्या आहेत. महाराष्ट्रातील ‘इस्लामिक स्टेट’च्या (Islamic State) आतंकवादी ‘मॉड्यूल’विषयी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण; मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा उपक्रम)
‘व्हीपीएन् नेटवर्क’चा वापर
एनआयएला आतंकवादी शर्जिल शेखच्या (Terrorist Sharjeel Sheikh) भ्रमणभाषमध्ये अनेक व्हिडिओ सापडले. यातून त्याचा आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये इस्लामिक स्टेटचा झेंडा दिसत असून गोळीबार करणे, सीरियामध्ये मास्क घालून फिरणे, पाकिस्तान आणि सीरिया येथील भाषणे सापडली आहेत. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात ‘व्हीपीएन् नेटवर्क’चा (VPN network) वापर केला जात होता. इसिसच्या आतंकवाद्यांकडून एका व्यक्तीचा गळा चिरण्याचा व्हिडिओही त्यात सापडला.
इतर जिहादी कागदपत्रेही जप्त
‘व्हॉइस ऑफ हिंद’ची (Voice of Hind) ‘प्रचार पत्रिका’ आणि इतर जिहादी कागदपत्रेही मोबाईलमध्ये सापडली आहेत. याबरोबर देशाबाहेर मुसलमानांच्या होणार्या हत्या, खिलाफत (Caliphate) आणि इतर संघटनांच्या पत्रिका अशी कागदपत्रेही सापडली आहेत. आरोपी तबीश सिद्दीकी आणि बरोदावाला यांनी ‘बयाथ’ (संघटनेसाठी एकनिष्ठ रहाण्याची शपथ) घेतली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community