…तर गड-किल्ल्यांवरही वक्फ कब्जा करेल!

282

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री भवानीमाता आणि गुरु यांच्या आशीर्वादाने शौर्य अाणि अतुलनीय पराक्रम करून मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या हिंदवी स्वराज्यातील ३०० हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ले आजही महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत; मात्र छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे स्मरण करून देणाऱ्या या गड-किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम वाढत आहे. अनेक गड-किल्ल्यांवर मजार, दर्गे, थडगे आदी अनधिकृत बांधकाम करून त्यांचे नियोजबद्धरित्या इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. गडांवरील जमीन बळकावण्याचा हा एकप्रकारे ‘लँड-जिहाद’ चालू आहे, असेच म्हणावे लागेल.

शिवकालीन ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर

गड-किल्ले यांवर प्रथम थडगे बांधायचे, त्यावर चादर चढवायची आणि त्यानंतर तेथे दर्गा बांधून गड-किल्यांवर इस्लामचे धार्मिक स्थान निर्माण करायचे. सर्व गडावर या एकाच पद्धतीने होत असलेले प्रकार हा गड-किल्ल्यांचे इस्लामीकरण करण्याचा नियोजनबद्ध कट आहे. गडांवर असलेली मंदिरे शिवकालीन असूनही त्यांची वेळीच डागडुजी न झाल्यामुळे शिवकालीन हा अमूल्य ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे पुरातत्व विभाग गडावरील शिवकालीन वास्तूंच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करत आहे आणि दुसरीकडे किल्ल्यांवर होणाऱ्या मजार, दर्गे आदी अवैध बांधकामांवर कारवाई करत नाही. गड-किल्ल्यांवरील ही अवैध बांधकामे वेळीच न पाडल्यास भविष्यात यांचे ट्रस्टी गडावरील जागेवर मालकी हक्क सांगतील किंवा ही भूमी वक्फ मंडळाच्या नावे करण्याचा धोका संभवतो. भविष्यात हे ट्रस्टी मालकीसाठी न्यायालयात गेल्यास शासनाची यंत्रणा, पैसा, मनुष्यबळ या गोष्टींमध्ये वाया जाईल. असे होऊ नये, यासाठी या गडांवरील अनधिकृत बांधकामांवर सरकारने वेळीच कारवाई करावी.

(हेही वाचा गुजरातमध्ये शाही इमाम म्हणतात, मुसलमानांनी एकजूट होऊन भाजपाला मतदान करू नये)

गुन्हे दाखल करा!

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या प्रकरणाची केंद्रीय पथक पाठवून सखोल चौकशी करून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच गड-किल्ल्यांवरील सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडून किल्ल्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी केली, अन्यथा हिंदु जनजागृती समिती राज्यभर तीव्र आंदोलन करेल. छत्रपती शिवरायांच्या वास्तूंवर होत असलेली अतिक्रमणे कदापि सहन केली जाणार नाहीत, याची गंभीर दखल पुरातत्व विभाग आणि शासन-प्रशासन यांनी घ्यावी.

अतिक्रमणग्रस्त गड-किल्ले

विशाळगड

vishalgad

बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणारा विशाळगड. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर १०० हून अधिक अनधिकृत आरसीसी बांधकामे झाल्याचे हिंदु जनजागृती समितीने एक वर्षभरापूर्वी माहितीच्या अधिकरात उघड केले. विशेष म्हणजे येथील ग्रामपंचायतीने या अतिक्रमणाला अवैध ठरवले असून ही बांधकामे त्वरित हटवण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांच्यासह राज्यभरात आंदोलनही केले; मात्र ती अतिक्रमणे अद्याप हटवण्यात आलेली नाहीत.

दुर्गाडी किल्ला

durgadi

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली, त्या दुर्गाडी गडावरील श्री दुर्गाडी मंदिराच्या मागे असलेली भिंत ‘ईदगाह’ (ईदच्या दिवशी नमाजपठण करण्याची जागा) असल्याचा दावा स्थानिक मुसलमानांकडून करण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. वर्षातून २ वेळा येथे नमाजपठण केले जाते; मात्र यासाठी ही भिंत असलेल्या गडाच्या अर्ध्या भागात हिंदूंना कायमस्वरूपी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून येथे राज्य राखीव दलाचे ८ पोलीस २४ तास पहाऱ्यासाठी ठेवण्यात आले आहेत. मुसलमान ज्या भिंतीला ईदगाह म्हणत आहेत, त्यावर ईदगाहप्रमाणे मनोरे नाहीत, तसेच मौलवीला उभे रहाण्यासाठी जागाही नाही. मागील ४८ वर्षे हा प्रश्न न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

(हेही वाचा मविआच्या काळात कौशल्य विकास केंद्राची जमीन ‘उर्दू लर्निंग सेंटर’ला आंदण)

श्री मलंगड

malang gad

श्री मलंगगडावर नवनाथांपैकी सात नाथांच्या समाध्या आहेत, तसेच हे नाथपंथीय साधू मलंगबाबा यांचे समाधीस्थान आहे. वर्ष २००४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी सरकारच्या काळात सरकारने या भूमीला वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित केले आहे. या विरोधात येथील सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे येथील दिनेश देशमुख यांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली असून सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे; मात्र मागील काही वर्षांपासून मुसलमान स्वत:ची वस्ती वाढवून मलंगगड बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत.

कुलाबा किल्ला

colaba

शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या कुलाबा किल्ल्यावरील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या जवळच अवैधपणे थडग्याचे पक्के बांधकाम करण्यात आले आहे. २ वर्षांपूवी तेथे दगड रचण्यात आले होते. मागील वर्षी त्यावर पक्के बांधकाम करून आता तेथे चादर चढवली जात आहे. ही मजार वेळीच हटवली नाही, तर भविष्यात या ठिकाणी दर्गा उभारला जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या जवळील कुलाबा किल्ल्यावर इस्लामी अतिक्रमण होत आहे. हे पुरातत्व विभागाचे अपयश आहे, तसेच हे राज्य सरकारचेही अपयश आहे.

माहिम किल्ला, मुंबई

mahim

माहिम किल्ल्याचे अस्तित्व सध्या केवळ नावापुरतेच आहे. या किल्ल्यावर पूर्णपणे अवैध वस्ती वसवण्यात आली आहे. गडाचे मुख्य प्रवेशद्वार लोखंडी जाळी ठोकून बंद करून आतमध्ये मुसलमान कुटुंबे रहात आहेत. या गडाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर पुरातत्व विभागाचा फलक केवळ नावाला शिल्लक आहे. किल्ल्याच्या मागील भागात मद्य पिणे, जुगार खेळणे, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी अपप्रकार दिवसाढवळ्या सर्रासपणे चालू आहेत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरून अतिरेकी कारवाया यापूर्वी झालेल्या असतांना समुद्र किनाऱ्यावरील या किल्ल्यावर अवैध वस्ती वाढवणे हे संपूर्ण देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा.

लोहगड

lohgad

पुण्यातील लोहगडावर काही वर्षांपूर्वी एक थडगे बांधण्यात आले. त्यानंतर तेथे एका मुसलमान फकीराला बसवण्यात आले. कोरोनाच्या काळात या व्यक्तीचे निधन झाले. मागील काही वर्षांपासून प्रतिवर्षी येथे उरूस साजरा केला जात आहे. उरूस करतांना गडावर मद्य पिणे, मांस शिजवणे आदी अवैधपणे करून गडावर घाण केली जाते. कोरोनाच्या काळात या थडग्याच्या भोवती ५-६ फूट उंच पक्क्या भिंती उभारण्यात आल्या असून या थडग्याभोवती दर्गा उभारला जात आहे. गंभीर म्हणजे हा दर्गा बांधण्यासाठी गडावरील शिवकालीन दगड वापरले जात आहेत. मागील काही वर्षांपासून येथे ‘हाजी हजरत उमरशहावली बाबा दर्ग्या’कडून अवैधरित्या उरूस साजरा केला जात आहे. १३ डिसेंबर २०१८ या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाकडून मुंबईच्या पुरातत्व विभागाला ‘गडावर उरूस किंवा अन्य कोणताही धार्मिक विधी करू नये’, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. स्थानिक शिवप्रेमी, गडाचे परिसर यांनी लोणावळा येथील ग्रामीण पोलीस ठाणे, तसेच पुणे येथील पुरातत्व विभागाचे कार्यालय येथे लेखी तक्रार देऊन गडावरील अवैध बांधकाम अद्याप तोडण्यात आलेले नाही.

(लेखक – सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक.)

(हेही वाचा कृष्णनीती वापरूनच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य – रणजित सावरकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.