इस्त्रायल-हमास युद्ध (Israel-Hamas Conflict) गेल्या ७ ऑक्टोबरपासून सुरू आहे. हमासच्या एका नेत्याने शुक्रवारी केरळच्या मलप्पूरमध्ये सॉलिडेरिटी युथ मुव्हमेंटने आयोजित केलेल्या एका रॅलीत भाग घेतला. एका व्हिडियोमध्ये हमास दहशतवादी संघटनेचा नेता खालिद माशेल लोकांसमोर भाषण करताना दिसत आहे.
हमासचा दहशतवादी खालिद माशेलने या रॅलीला ऑनलाइन भाषण करून लोकांना संबोधित केले आहे. माशेलच्या भाषणाचा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी निषेध केला आहे. त्यांनी केरळ पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या कार्यक्रमातील माशेलच्या सहभागाविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
Hamas leader Khaled Mashel’s virtual address at the Solidarity event in Malappuram is alarming. Where’s @pinarayivijayan‘s Kerala Police ? Under the guise of ‘Save Palestine,’ they’re glorifying Hamas, a terrorist organization, and its leaders as ‘warriors.’ This is… pic.twitter.com/51tWi88wTb
— K Surendran (@surendranbjp) October 27, 2023
सुरेंद्रन यांनी Xवर लिहिले आहे की, मलप्पूरममध्ये सॉलिडेरिटी कार्यक्रमात हमास नेता खालिद माशेलचे व्हर्च्युअल संबोधन हा चिंतेचा विषय आहे. पिनाराई विजयन यांचे केरळ पोलीस कुठे आहेत? ‘सेव्ह पॅलेस्टाइन’च्या आडून ते हमास या दहशतवादी संघटनेचा आणि त्यांच्या नेत्यांचा ‘योद्धा’ म्हणून गौरव करत आहेत, हे अस्वीकार्य आहे