Israel-Hamas conflict: संयुक्त राष्ट्र परिषदेत गाझामधील तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला

246
Israel-Hamas conflict: संयुक्त राष्ट्र परिषदेत गाझामधील तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला
Israel-Hamas conflict: संयुक्त राष्ट्र परिषदेत गाझामधील तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला

इस्रायल आणि हमास (Israel-Hamas conflict) यांच्यात दोन महिन्यांहून जास्त काळ संघर्ष सुरू आहे. गाझामध्ये तात्काळ युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) संयुक्त राष्ट्रसंघाने (UN)आणलेला प्रस्ताव फोल ठरला आहे. अमेरिकेतील व्हेटोमुळे हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.

यूएनने मांडलेल्या मसुद्याच्या ठरावात गाझामध्ये तात्काळ युद्धविराम आणि सर्व ओलिसांची बिनशर्त तात्काळ सुटका करण्याची मागणी करण्यात आली होती. १३ सदस्य देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. अमेरिकेने मात्र ठरावावर व्हेटो केला.

(हेही वाचा – Pune: पुणे ते लोणावळा १० डिसेंबरला मेगाब्लॉक, कोणत्या उपनगरीय गाड्या रद्द; जाणून घ्या…)

यूएनमधील अमेरिकेचे दूत रॉबर्ट वुड यांनी युद्धविराम प्रस्ताव वास्तवाच्या पलीकडे असल्याचे सांगितले. प्रस्तावाला व्होटो केल्यानंतर वुड म्हणाले की, मसुदा तयार करण्याची आणि प्रस्तावावर मतदान करण्याची प्रक्रिया घाईत झाली. योग्य सल्लामसलत झाली नाही. आमच्या सर्व शिफारशींकडे दुर्लक्ष करण्यात आले. अमेरिका गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याच्या आवाहनाला समर्थन देत नाही, कारण यामुळे युद्धाची बीजे पेरली जातील. हमासचा इस्रायलसाठी धोका कायम आहे. तसेच कोणतेही सरकार आपल्या सीमेवर धोका पत्करणार नसल्याचे वुड म्हणाले. आम्ही तात्काळ युद्धबंदीच्या आवाहनाला पाठिंबा देत नाही. यामुळे युद्धाची बीजे पेरली जातील, असेही ते म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.