मागील दोन आठवड्यापासून पॅलेस्टिनी (Israel Hamas War) दहशतवादी संघटना हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. तसेच या युद्धाचे पडसाद आता पुणे शहरातही उमटले आहेत. या दोन्ही देशांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचा काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हा प्रकार हाणून पाडला. या प्रकरणी पुणे शहरातील कोंढवा, लष्कर, समर्थ, खडक पोलीस ठाण्यात ४ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इस्त्राल (Israel Hamas War) देशाच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिकृती असलेले स्टीकर रस्त्यांवर पायदळी येतील या उद्देशाने चिटकवल्याचे समोर आले आहे. मात्र, पुणे पोलिसांनी काही वेळातच हा प्रकार उघड करत अशाप्रकारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल ४ गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पुण्यातील लष्कर, समर्थ तसेच खडक व कोंढवा पोलीस ठाण्यात चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लष्कर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी ६ आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचा – Virat Kohli vs Lionel Messi : ‘या’ आकडेवारीत विराटने टाकलं मेस्सीला मागे)
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर इस्रायलने (Israel Hamas War) हमास संघटनेच्या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. याचे पडसाद संपूर्ण जगात उमटताना दिसत आहेत. याच मुद्यावरून पुणे शहरातही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी कोंढवा, लष्कर, खडक व समर्थ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काही जणांकडून रस्त्यांच्या मधोमध इस्त्रायल देशाच्या राष्ट्रध्वजाचे प्रतिकृती असलेले स्टीकर चिटकवण्यात आले होते. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन हे स्टिकर काढले आणि सबंधितावर गुन्हे दाखल केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community