Israel-Hamas War : भारतीय मुसलमानांना आतंकवाद्यांच्या पोशिंद्यांची चिंता; पॅलेस्टिनी राजदूतांसोबत बंद दाराआड बैठक 

मुस्लिम नेत्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “सरकारने पॅलेस्टाईनचे समर्थन करण्याची भूमिका कायम ठेवावी, अशी आमची मागणी आहे. महात्मा गांधींनीही स्वतंत्र पॅलेस्टाईनचे समर्थन केले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्याचे समर्थन केले होते.'' (Israel-Hamas War)

309
Israel-Hamas War : भारतीय मुसलमानांना आतंकवाद्यांच्या पोशिंद्यांची चिंता; पॅलेस्टिनी राजदूतांसोबत बंद दाराआड बैठक 
Israel-Hamas War : भारतीय मुसलमानांना आतंकवाद्यांच्या पोशिंद्यांची चिंता; पॅलेस्टिनी राजदूतांसोबत बंद दाराआड बैठक 

भारतातील मुसलमान नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून गाझामध्ये इस्रायली सैन्याने केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रकरणी टीका केली आहे. (Israel-Hamas War) भारत सरकारला पॅलेस्टाईन समर्थक धोरणे बनवण्याचे आवाहन केले. हमासने इस्रायलवर हल्ला केल्यापासून इस्रायलचे लष्कर गाझा पट्टीवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. (Israel-Hamas War)

(हेही वाचा – Mahua Moitra Case : महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे प्रकरण चांगलेच गाजणार)

इस्रायलवर हमासने हल्ला केल्ल्यापासून इस्रायलचे लष्कर गाझा पट्टीवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. भारत सरकारने इस्रायलला समर्थन दिले असूनही भारतातील मुसलमान संघटना गाझामध्ये आतंकवाद्यांचे पोशिंदे असलेल्यांचा कैवार घेत आहेत. भारतातील मुस्लिम नेत्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर आरोप केले आहेत. मुस्लिम नेत्यांनी संयुक्त निवेदनात ज्यू (इस्रायली) सरकार पॅलेस्टिनी लोकांवर सातत्याने अत्याचार करत आहे, असाही आरोप त्यात करण्यात आला आहे. (Israel-Hamas War)

या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या मुस्लिम संघटनांमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत उलामा-ए-हिंद, जमात-ए-इस्लामी, इबादान-ए-शरिया, ऑल इंडिया उलेमा आणि मसाइख बोर्ड, मिल्ली कौन्सिलचे अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रतिनिधींचा समावेश आहे. याशिवाय जमियत अहल-ए-हदीस आणि दिल्लीच्या फतेहपुरी मशीद आणि शिया जामा मशीदचे इमाम आणि मजलिस-ए-मुशावरतचे माजी अध्यक्ष यांनीही या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

मुस्लिम नेत्यांनी भारत सरकारला पॅलेस्टाईनबाबतचे जुने धोरण अवलंबण्याचे आवाहनही केले आहे. संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “सरकारने पॅलेस्टाईनचे समर्थन करण्याची भूमिका कायम ठेवावी, अशी आमची मागणी आहे. महात्मा गांधींनीही स्वतंत्र पॅलेस्टाईनचे समर्थन केले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्याचे समर्थन केले होते.” (Israel-Hamas War)

हॉस्पिटलवरील हल्ल्यात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान गाझा पट्टीतील अल-अहली अरब हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या स्फोटात 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाईनने दावा केला आहे की, या हॉस्पिटलला इस्रायलच्या हवाई हल्ल्याचा फटका बसला आहे. इस्रायलने हे आरोप फेटाळून लावले असून पॅलेस्टाईनच्या इस्लामिक जिहादने डागलेल्या रॉकेटच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे म्हटले आहे.  (Israel-Hamas War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.