हमासने इस्त्रायलवर (Israel-Palestine War) डागलेल्या हजारो क्षेपणास्त्रानंतर इस्त्रायलने युद्ध घोषित केले. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांनी इस्लामिक रेझिस्टन्स मुव्हमेंटला (Islamic Resistance Movement) (Hamas) इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी शनिवारी सायंकाळी देशातील जनतेला संबोधित केले आहे.
या हल्ल्याचे वर्णन करताना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्याचे इस्त्रायलच्या इतिहासातील एक गंभीर घटना म्हणून वर्णन केले आहे तसेच हमासला नष्ट करण्यासाठी आम्ही सर्व शक्ती वापरू. हे युद्ध बराच काळ चालेल. देशातील नागरिकांनी यासाठी तयार रहावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
(हेही वाचा – Indian Air Force : चिनुक अन् सी-२९५ने वाढवली हवाई दलाची ताकद )
गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे या भागात किमान २३२ पॅलेस्टिनी ठार आणि १,६९७ जखमी झाले. दरम्यान, इस्त्रायलमधील मृतांची संख्या २०० च्या पुढे गेली आहे.
गाझातील नागरिकांना शहर सोडण्याचे आवाहन…
नेत्यनाहू पुढे म्हणाले की, हमासचे लोक जिथे जिथे लपले आहेत. त्या सर्व ठिकाणांना आम्ही उडवून टाकू. यावेळी त्यांनी गाझातील लोकांना तात्काळ शहर सोडण्याचे आवाहन केले आहे. हमासने काही इस्त्रायली नागरिक आणि सैनिकांनाही ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली. इस्त्रायली लष्कराने प्रत्युत्तरादाखल हमासच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या संघर्षामुळे दोन्ही बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.