इस्रायल-हमास युद्ध चालू असतांनाच लेबनॉनमधून कार्यरत असलेली हिजबुल्ला ही आतंकवादी संघटना इस्रायलशी थेट युद्धाच्या तयारीत आहे. (Israel–Hezbollah Conflict) हिजबुल्लाचा नेता शेख नईम कासिम याने सांगितले, ‘लेबनॉन-इस्रायल सीमेवर (Lebanon-Israel border) दोघांमधील वैर वाढत आहे. इस्रायलच्या सैन्याने लेबनॉनच्या सीमा ओलांडल्या, तर आम्ही त्यांचा सीमेवर नाश करू.’ याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी हिजबुल्लाला चेतावणी दिली की, ते उत्तर भागात मोठ्या कारवाईची सिद्धता करत आहेत.
(हेही वाचा – Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा, शिवसेना आमदारांच्या पक्षांतराच्या दाव्यावर शिंदेंचा पलटवार)
हिजबुल्लाने नुकतेच इस्रायलमधील किरियत शमोना येथे ड्रोनद्वारे आक्रमण केले. लेबनॉनच्या सीमेवर असलेल्या नकौरा शहरावर इस्रायलने केलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून हे आक्रमण करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हिजबुल्लाविरुद्धच्या युद्धाचा निर्णय लवकरच घेणार ! – इस्रायल
इस्रायलचे संरक्षणदलाचे प्रमुख जनरल हर्जी हालेवी यांनी सांगितले की, इस्रायल लवकरच हिजबुल्लाविरुद्ध थेट युद्ध लढायचे कि नाही, हे ठरवेल. ‘गेल्या ८ महिन्यांपासून आम्ही त्याच्यावर आक्रमण करत आहोत. याची मोठी किंमत हिजबुल्लाला चुकवावी लागली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी नुकतीच लेबनॉनच्या सीमेला लागून असलेल्या किरयत शमोना भागाला भेट दिली. येथे त्यांनी इस्रायली सैनिकांचीही भेट घेतली. ‘आम्ही हिजबुल्लाला उत्तर देण्यासाठी तयार आहोत’, असे नेतान्याहू या वेळी बोलतांना म्हणाले. (Israel–Hezbollah Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community