इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष (Israel Iran War) पेटला आहे. ध्य इराणच्या इसफहान शहरावर इस्रायलने क्षेपणास्त्र सोडल्याची माहिती आहे. या युद्धावर (Israel Iran War) स्पेसएक्स, टेस्ला आणि सोशल मायक्रोब्लॉगिंग एक्स या साईट्सचे प्रमुख असलेल्या एलॉन मस्क (Elon Musk) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आपण एकमेकांवर क्षेपणास्त्र (रॉकेट) डागण्यापेक्षा, ते ग्रहांवर पाठवायला हवेत.” असं ते म्हणाले आहेत. (Israel Iran War)
We should send rockets not at each other, but rather to the stars pic.twitter.com/h4apedUrsU
— Elon Musk (@elonmusk) April 19, 2024
ईमेलवरून मिम्स पाठवावेत
ट्विटमध्ये मस्क यांनी मजकुरासह स्पेसएक्सने अवकाशात प्रक्षेपित केलेल्या रॉकेटचा एक फोटो जोडला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात एलॉन मस्क (Elon Musk) यांची आणखी एक प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ज्यामध्ये मस्क म्हणतात, “यापेक्षा जगातील नेत्यांनी एकमेकांना ईमेलवरून मिम्स पाठवावेत आणि जनतेला ठरवू द्यावे की कोण जिंकेल? युद्धापेक्षा (Israel Iran War) मी कधीही अशा उपक्रमाला पाठिंबा देईल.” अशी प्रतिक्रिया मस्क (Elon Musk) यांनी दिली आहे. एकप्रकारे दोन्ही देशांनी शांतता ठेवावी, असाच अर्थ मस्क यांच्या प्रतिक्रियेतून दिसून येत आहे. (Israel Iran War)
हे पहा –
Join Our WhatsApp Community