हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल युद्ध करण्यावर ठाम आहे आणि गाझावर त्याचे हल्ले सुरूच आहेत. (Israel-Palestine Conflict) दरम्यान इस्रायलने ११ लाख पॅलेस्टिनींना उत्तर गाझा सोडण्याचा इशारा जारी केला आहे. इस्रायलच्या लष्कराने उत्तर गाझामधील ११ लाख लोकांना २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी या इशाऱ्याला विनाशकारी मानवतावादी परिणामांचा धोका, असे संबोधले आहे. (Israel-Palestine Conflict)
(हेही वाचा – Ind vs Pak : भारत – पाक सामन्यादरम्यान पावसाची शक्यता)
संयुक्त राष्ट्रांनी सल्ला देऊ नये – इस्रायल संतप्त
संयुक्त राष्ट्रांच्या या विधानामुळे इस्रायल संतप्त झाला आहे. इस्रायलने संयुक्त राष्ट्रांचे विधान खोटे आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, दहशतवाद्यांनी आमच्या नागरिकांची हत्या केली, त्यांच्यावर पाशवी अत्याचार केले. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांनी आम्हाला कोणताही सल्ला देऊ नये. त्यांनी हमासच्या हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे आणि हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यात मदत केली पाहिजे. (Israel-Palestine Conflict)
उत्तर गाझा रिकामे करण्याच्या आदेशावर संयुक्त राष्ट्रांनी वरिष्ठ इस्रायली अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. एका सूत्रानुसार, इस्रायलने 24 तासांच्या आत उत्तर गाझा रिकामे करण्याचा आदेश दिल्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गुरुवारी रात्री इस्रायली राजदूत गिलाड एर्डन यांना या मुद्द्यावर परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले.
इस्रायली अल्टिमेटमचा अर्थ काय असू शकतो ?
उत्तर गाझा रिकामा करण्याच्या अल्टिमेटमचे एक लक्षण असे असू शकते की, इस्रायल आता गाझावर जमिनीवरील मोठे आक्रमण करू शकेल. इस्रायलच्या सैन्याने सांगितले की, ते गाझामध्ये संभाव्य ग्राउंड ऑपरेशनची तयारी करत आहेत; परंतु नेत्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. लेफ्टनंट कर्नल रिचर्ड हॅच यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, सैन्य जमिनीवरील कारवाईची तयारी करत आहे. इस्रायलने सुमारे 3 लाख 60 हजार राखीव सैनिकांना बोलावले आहे. (Israel-Palestine Conflict)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community