Israel-Palestine Conflict : इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धाविषयीच्या सोशल मीडिया पोस्टविषयी सरकार गंभीर; घेतले ‘हे’ निर्णय

युद्धासंदर्भातील चुकीचे दावे, व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्यांवर सायबर कंट्रोल रुममधून लक्ष ठेवले जाणार आहे.

173
Israel-Palestine Conflict : इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धाविषयीच्या सोशल मीडियावर पोस्टविषयी सरकार गंभीर; घेतले 'हे' निर्णय
Israel-Palestine Conflict : इस्रायल-पॅलेस्टाइन युद्धाविषयीच्या सोशल मीडियावर पोस्टविषयी सरकार गंभीर; घेतले 'हे' निर्णय

पॅलेस्टाइनमधील दहशतवादी संघटना असलेल्या हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतियांमध्ये पॅलेस्टाइन  आणि इस्रायल यांच्यापैकी कोणत्या देशाला समर्थन द्यायचे याविषयी मोठ्या प्रमाणात वादविवाद चालू आहे. 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टाइनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ला केल्यापासून मोठ्या युद्धाला सुरुवात झाली असून याचा परिणाम आता थेट महाराष्ट्रातही दिसून येत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विशेष सायबर कंट्रोल रुम तयार करण्यात आला आहे. या युद्धासंदर्भातील चुकीचे दावे, व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्यांवर या सायबर कंट्रोल रुममधून लक्ष ठेवले जाणार आहे. (Israel-Palestine Conflict)

(हेही वाचा – Virat Kohli : कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम)

सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून त्या माध्यमातून गाझा पट्टीत इस्रायलकडून अत्याचार होत असल्याचा दावे केले जात आहेत. या कंटेंटच्या माध्यमातून लोकांना पॅलेस्टाइन आणि हमासचं समर्थन करण्याचे आवाहनही केले जात आहे. महाराष्ट्रामध्ये असे कट उधळून लावण्यासाठी विशेष सायबर कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. कट्टरतावादी लोकांकडून खोट्या व्हिडीओ आणि फोटोंच्या आधारे भारतातील मुसलमानांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी काही सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे.

कायदेशीर कारवाई करणार

इस्रायलमधील संघर्षाविषयी सायबर सेलच्या माध्यमातून विद्वेष पसरवणाऱ्यावर नजर ठेवली जाणार आहे. सोशल मीडियावर अकाऊंट्सवरही विशेष लक्ष असणार आहे. तसेच खोट्या आणि फसव्या फोटो, व्हिडिओंच्या आधारे तथ्यहीन आणि विशिष्ट हेतूने दावे करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. (Israel-Palestine Conflict)

इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये सुरु असलेला हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच भारताने ‘ऑप्रेशन अजय’च्या माध्यमातून इस्रायलमधील भारतीयांना मायदेशी आणण्याची मोहीम सुरु केली आहे. आज पहाटे 212 भारतीयांना विशेष विमानाने भारतात आणण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या भारतियांचे विमानतळावर मायदेशात स्वागत केले. भारतात परतल्यानंतर यापैकी अनेक भारतियांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. (Israel-Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.