Israel-Palestine Conflict : भारतीय कंपन्या चिंतेत; होऊ शकते नुकसान 

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ३-४ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या विदेशी कर्जाची परतफेड करण्याचा खर्चही वाढेल आणि येत्या तिमाहीत त्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो.

114
Israel-Palestine Conflict : भारतीय कंपन्या चिंतेत; होऊ शकते नुकसान 
Israel-Palestine Conflict : भारतीय कंपन्या चिंतेत; होऊ शकते नुकसान 

इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धाचे जागतिक स्तरावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. (Israel-Palestine Conflict) ७ दिवसानंतरही युद्ध तितक्याच तीव्रतेने चालू आहे. त्यामुळे इस्रायलमधील कामकाज तर बंद आहेच; मात्र त्यामुळे तेथील कंपन्यांचे अन्य देशांत चालू असलेल्या कामावरही परिणाम होत आहे.

(हेही वाचा – Raj Thackeray PC on Toll Issue : ४ मिनिटांच्या वर कोणतेही वाहन टोल नाक्यावर थांबणार नाही; शिवतीर्थावरील बैठकीत काय ठरले)

भारतीय आस्थापनांना 2,500 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. आयात केलेल्या 5G नेटवर्क गियरची किंमत 2,000 ते 2,500 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, टेलिकॉम कंपन्यांच्या 5G रोलआउट योजनांनाही विलंब होऊ शकतो. सध्या देशातील मोजक्याच शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ३-४ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या विदेशी कर्जाची परतफेड करण्याचा खर्चही वाढेल आणि येत्या तिमाहीत त्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. (Israel-Palestine Conflict)

स्थानिक फोन नेटवर्कमध्ये वापरल्या जाणार्‍या टेलिकॉम गियरपैकी सुमारे 67 टक्के परदेशातून आयात केले जाते. एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंगसारख्या कंपन्या, हा पुरवठा करतात. याशिवाय भारतातील अनेक कंपन्यांची इस्रायलमध्ये गुंतवणूक आहे. विमानांचे सुटे भाग बनविणाऱ्या एच आर गिओन या कंपनीचे विप्रोने २०१६ मध्ये अधिग्रहण केले आहे. टीसीएस कंपनीचे इस्रायलमध्ये सुमारे ११०० कर्मचारी आहेत. २००५ पासून कंपनीने तिथे काम चालू केले आहे. इन्फोसिसचीही इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. औद्योगिक संशोधनाच्या क्षेत्रातही कंपनीचे काम आहे. एचसीएल टेक कंपनीची इस्रायलमध्ये २ कार्यालये आहेत. कंपनीसाठी धोरणात्मक गुंतवणूक आहे. (Israel-Palestine Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.